तुम्ही केंद्र सरकारकडे संपर्क साधा , सर्वोच्च न्यायालयाने ‘ ती ‘ याचिका फेटाळल्याने तुमचं आयुष्यही होणार प्रभावित

शेअर करा

१३ वर्षाखालील बालकांच्या सोशल मीडिया वापराला प्रतिबंध घालावा अशी विनंती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ही याचिका फेटाळून लावलेली आहे या संदर्भात केंद्र सरकारकडे दाद मागावी असे निर्देश न्यायाधीश भूषण गवळी आणि न्यायाधीश ऑगस्टीन मसीह यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला दिलेले आहेत. 

13 वर्षाखालील बालकांच्या मेंदूवर सोशल मीडियामुळे गंभीर शारीरिक मानसिक आणि मानसशास्त्रीय प्रभाव होतो त्यामुळे तेरा वर्षाखालील बालकांना सोशल मीडिया वापरण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती त्यानंतर न्यायालयाने तुम्ही केंद्र सरकारकडे संपर्क साधा असे सांगत यावर विचार करण्यास नकार दिलेला आहे. 


शेअर करा