खोटे संमतीपत्र आणि शपथपत्र दाखल करून न्यायालयाची देखील फसवणूक , तिघांवर गुन्हा दाखल

शेअर करा

खोटे संमतीपत्र आणि शपथपत्र दाखल करून न्यायालयाची देखील फसवणूक करणाऱ्या तीन जणांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोप मध्ये चक्क सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त लेखाधिकारी असलेले अश्रू यादव नरोटे ( वय 62 राहणार लक्ष्मी नगर ) असे फिर्यादी यांचे नाव असून लक्ष्मीनगर येथे त्यांची तीन गुंठे जागा आहे. ती त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला विकसित करण्यासाठी दिली होती मात्र काही कारणाने त्यांनी सहमतीने करार रद्द केला. नरेश कोडम नावाच्या व्यक्तीने यासंदर्भात बनावट दस्त तयार केला आणि साक्षीदार म्हणून त्यांची पत्नी जयश्री कोडम आणि रुपेश कोडम असल्याचे दाखवत खोट्या कागदपत्राच्या आधारे अहिल्यानगर येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. 

फिर्यादी अश्रू नरोटे यांनी यासंदर्भात न्यायालयात हरकत घेत माहिती अधिकार कायद्यान्वये वेगवेगळी माहिती मिळवली. दस्ताची नोंदणी 27 मे 2019 रोजी झाले असल्याचे आणि त्या दिवशी साक्षीदार रुपेश कोडम तिथे उपस्थित असल्याचे भासवण्यात आले सोबतच  सदर दस्तावेज कसा बनावट आहे यासंदर्भात पुरावे फिर्यादी नरोटे यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केले त्यानंतर अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस एस पारवे यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

नरेश विष्णुपंत कोडम , जयश्री नरेश कोडम ( दोघेही राहणार तपोवन रोड अहिल्यानगर ) , रुपेश प्रकाश कोडम ( वय 41 राहणार मुळा कालवा सर्वेक्षण उपविभाग पांडाने तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक )अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. कट रचणे , बनावट कागदपत्रे तयार करणे , बनावट कागदपत्रे खरी भासवणे आदी कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा