घरापासून दूर असलेल्या जवानांना ‘ ती ‘ हेरायची आणि इथून सुरु व्हायचा मोठ्ठा खेळ मात्र अखेर …

शेअर करा

केवळ सैन्यातले जवान या तरुणीच्या टोळक्याच्या निशाण्यावर असायचे. घरापासून दूर असलेले जवान हेरले जायचे आणि मग त्यांच्यावर ट्रॅप टाकला जायचा. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना उघडकीस आली असून पोलिसांनी तरुणीसह तिघांना अटक केली आहे. तर टोळीतील तिघेजण अद्यापही फरार आहेत. सायबर सेल व मेरठ पोलिसांच्या चौकशीत आरोपीने 12 ते 15 जणांना हनी ट्रॅप प्रकरण्यात अडकवल्याचे तरुणीने कबुल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्यातील एक जवानाने सायबर सेलमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मेरठमधील एका तरुणीने गँग तयार केली आहे. तिने सैन्यातील अनेक जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आहे. त्याचवेळी तरुणीने मुजफ्फरनगर निवासी असलेले सैन्यातील एका जवानांकडून सोन्याचे दागिनेही हस्तगत गेले होते आणि इतर देखील अनेक जवानांची तिने अशीच फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आलेला आहे.

अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहे. ही तरुणी गँगची प्रमुख आहे. ती पहिल्यांदा सैन्याच्या जवानांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत होती. त्यांना हॉटेलमध्ये भेटायची आणि अश्लील व्हिडीओ तयार करायची. यानंतर तरुणी जवानांना ब्लॅकमेल करण्याचा काम सुरू करीत असे. या प्रकरणात तरुणीसोबत आणखी दोन साथीदार होते.

एकदा सावज हेरले की वेगवेगळ्या आयडीने करायची संवाद सुरु करायची, त्यात कुठेतरी मासा गळाला लागायचा. सदर आरोपी तरुणीजवळून पोलिसांना तब्बल 12 बनावट आयडी सापडले आहेत. ती वेगवेगळ्या आयडीच्या माध्यनातून जवानांशी संवाद साधायची. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरापासून तरुणीने अनेक जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले आहे.

काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या एक जवानाला तरुणीने मेरठ येथे बोलवलं होतं. यानंतर ती फौजीला हॉटेलमध्ये घेऊन गेली. येथे त्याच्यासोबत अश्लील व्हिडीओ केला. त्यानंतर जवानाला बेहोश केल्यानंतर त्याचं सर्व सामान लुटलं आणि हॉटेलमधून फरार झाली.मात्र त्या जवानाने पुढे येऊन सायबर सेल मध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर तपासाला सुरुवात झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तरुणीसोबत दोघेजण असल्याचे दिसून आले होते. तेव्हापासून पोलीस या गँगचा शोध घेत होती. अटक केलेल्या आरोपींनी सांगितलं की, त्यांच्या निशाण्यावर राजस्थान, हरियाणा आणि गुजरातचे फौजी होते.


शेअर करा