नगर जिल्ह्यात लाचखोरीला कुठलीही मर्यादा राहिलेली नसून चक्क दिव्यांग व्यक्तींना देखील पैशासाठी वेठीस धरण्यात येत आहे. असाच एक प्रकार श्रीगोंद्यात समोर आलेला असून एका शासकीय कर्मचाऱ्याने दिव्यांग व्यक्तीकडून देखील तीन हजार रुपयांची लाच घेतली मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणताच माफी मागून लाज घेतलेले पैसे परत देण्याची वेळ या संबंधित सरकारी कर्मचाऱ्यावर आली.
उपलब्ध माहितीनुसार , एका दिव्यांग व्यक्तीने श्रीगोंदा तालुक्यातील शासकीय कामासाठी एका कार्यालयात अर्ज केलेला होता त्यावेळी कर्मचाऱ्याने खोटी माहिती देत तीन हजार रुपये खर्च येईल असे सांगत तीन हजार रुपयांची लाच घेतली. सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांना याप्रकरणी माहिती मिळाली आणि त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संबंधित शासकीय कार्यालय गाठले.
टिळक भोस यांनी प्रश्न विचारायला सुरू करताच शासकीय कर्मचाऱ्याची भंबेरी उडाली आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर या कर्मचाऱ्याने पैसे परत देतो माफ करा असे म्हणत सर्वांच्या समक्ष वृद्ध दिव्यांग व्यक्तीची पाया पडून माफी मागितली आणि तीन हजार रुपये परत दिले. टिळक भोस यांनी ही गंभीर बाब असून सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येतील त्या ठिकाणी आपण उभे राहू असे सांगितलेले आहे.