नगर शहरात एक खळबळजनक अशी घटना एमआयडीसी परिसरात समोर आलेली असून झेन इलेक्ट्रिकल कंपनीच्या साईटवर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 17 तारखेला सकाळी ही घटना उघडकीला आली.
उपलब्ध माहितीनुसार , ज्ञानदेव मुरलीधर खंडागळे ( वय 38 वर्ष राहणार तपोवन रोड सावेडी ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून हा प्रकार लक्षात येताच सहकारी प्रशांत देठे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टर विशाखा शिंदे यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच ज्ञानदेव खंडागळे यांचा मृत्यू झाल्याची घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे .