भांडणात मध्यस्थी करणं दांपत्याला पडलं महाग ,  वडगाव गुप्ता येथील घटना

शेअर करा

नगरमध्ये कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून वडगाव गुप्ता शिवारातील माळवाडी येथे भांडणात मध्यस्थी केल्यावरून चार जणांनी एका दांपत्याला लोखंडी रॉडने मारहाण केलेली आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. 

उपलब्ध माहितीनुसार , पवन जगन्नाथ आढाव ( वय 23 वर्ष राहणार माळवाडी वडगाव गुप्ता ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून हिरामण शिंदे ,विकास पारखे ,ऋषिकेश शिंदे ,प्रशांत शिंदे ( सर्वजण राहणार वडगाव गुप्ता ) अशी आरोपींची नावे आहेत. 

भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून वरील चारही जणांनी आपल्याला बेदम मारहाण केली असा आरोप फिर्यादी यांनी केलेला असून आरोपींनी घरातील टीव्ही आणि इतर वस्तूंची देखील तोडफोड केलेली आहे असे त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी भेट देऊन भेट दिली त्यानंतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 


शेअर करा