योगगुरु रामदेव बाबा सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत असून शरबत जिहाद वरून त्यांनी वक्तव्य केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची चांगलीच कान उघाडणी करत वादग्रस्त व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले.
रामदेव बाबा यांना भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही जाहिराती समाज माध्यमांवर पोस्ट करणार नाही अशी हमी देणारे प्रतिज्ञापत्र पाच दिवसात दाखल करा असेही आदेश देण्यात आलेले आहेत.
पतंजलीच्या सरबताचा प्रचार करताना रामदेव बाबा यांनी 3 एप्रिल रोजी हमदर्द कंपनी आणि रूह अफजा सरबताच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशाचा वापर हा मदरसे आणि मशिदीच्या उभारणीसाठी केला जातो असाही आरोप केलेला होता .