पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर वेश्याव्यवसाय होता सुरु, आंटीसोबत एका मुलीची केली सुटका

शेअर करा

चित्र : सांकेतिक

पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण शहरातील गजबजलेल्या रहिवासी परिसरात अवैधपणे चालवल्या जाणाऱ्या कुंटणखाण्यावर भिगवण पोलिसांनी छापा टाकीत दोन पीडित महिलांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत रोख रक्कमेसह 28 हजार 500 रुपयांचा जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांना गोपनीय सूत्राकडून पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या रहिवासी इमारतीमध्ये अवैधपणे वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे माने यांनी पोलिसांच्या एका पथकाची नियुक्ती करत छापा टाकला. आरोपी मिनीनाथ रमेश गायकवाड (वय 28 राहणार मदनवाडी मुळ, भगतवाडी तालुका करमाळा) रोहिदास गंगाराम दराडे (वय 29 राहणार अकोले ) हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 20 वर्षांची तरुणी आणि 40 वर्षांची महिला यांच्याकडून अवैधपणे कुंटणखाना चालवीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आणि कुंटणखाना चालवणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी आरोपी वापरत असलेले मोबाईल आणि रोख रक्कम मिळून 28 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.

सदर कारवाई पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह पोलीस हवालदार दत्तात्रय खुटाळे, नाना वीर, इंकलाब पठाण, महिला पोलीस नाईक सारिका जाधव या पथकाने केली. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना याठिकाणी अवैध व्यवसाय कसा आणि किती दिवसापासून चालू होता ? याचा आता पोलिसांना शोध घ्यायचा आहे.


शेअर करा