पेट्रोल पंपावर राडा प्रकरणातील ‘  त्या ‘ आरोपीच टोकाचं पाऊल 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून वांबोरी इथे गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास एका तरुणाने धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी वांबोरी पोलीस चौकीसमोर तरुणाचा मृतदेह ठेवण्यात आलेला होता मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार , निखिल रावसाहेब देवकर ( वय 23 वर्ष राहणार वांबोरी ) असे आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव असून वांबोरी येथील पेट्रोल पंपावर 18 तारखेला कामगारांना शिवीगाळ करून धुडगूस घातल्या प्रकरणी राहुरी पोलिसात निखिल देवकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. पेट्रोल पंपाचा मालक असलेल्या पिता-पुत्राने सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्यानंतर बदनामी झाली यामुळे निखिल देवकर याने टोकाचे पाऊल उचलले असा आरोप देवकर यांच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. 


शेअर करा