तोफखाना पोलीस जागृत ?,  बालिकाश्रम रोडच्या गोल्डन कॅफेवर छापा 

शेअर करा

नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील गोल्डन कॅफे येथे अश्लील चाळे सुरू असल्या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केलेली आहे आणि कॅफेच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , ओंकार कैलास ताठे ( वय 24 वर्ष राहणार ताठे मळा पंपिंग स्टेशन रोड बालिकाश्रम रस्ता ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने त्याच्या कॅफेमध्ये कंपार्टमेंट करून त्याला पडदे लावत शाळा कॉलेजातील मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली होती असा त्याच्यावर आरोप आहे. 

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना या संदर्भात माहिती मिळताच ठाणे अंमलदार सुनील शिरसाठ , सतीश त्रिभुवन , छाया गायकवाड यांच्यासोबत दोन पंच घेऊन त्यांनी 26 तारखेला दुपारी छापा टाकला. कॉफी शॉपचा कोणताही परवाना तिथे आढळून आला नाही. घटनास्थळी असलेल्या तरुण-तरुणींना समज देऊन पोलिसांनी सोडून दिलेले आहे

शहरात अनेक ठिकाणी शाळा आणि कॉलेजच्या परिसरात कॉफी शॉपच्या नावाखाली पडदे लावून अल्पवयीन मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. अनेकदा या विरोधात कारवाई देखील झालेली आहे मात्र कारवाई झाल्यानंतर काही कालावधीतच पुन्हा अशी कॉफी शॉप नवीन नावाने सुरू होतात असेही दिसून आलेले आहे. 


शेअर करा