नगरमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ,  बसमध्ये जागा तर मिळाली पण.. 

शेअर करा

नगरमधील बसस्थानकांवर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून माळीवाडा बस स्टँड इथे एक तारखेला दुपारी दोनच्या सुमारास एका महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सोनाली सोमनाथ निकरड ( वय 32 वर्ष राहणार दरेवाडी तालुका नगर ) असे फिर्यादी महिला यांचे नाव असून नेवासा इथे जाण्यासाठी त्या माळीवाडा बस स्टैंडवर आलेल्या होत्या. बसमध्ये त्यांना जागा मिळाली मात्र त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब झालेली होती. 

बसमध्ये प्रवास करण्यासाठी बसत असताना गर्दीचा फायदा घेत कुणीतरी पर्समधील पाच ग्रॅम 620 मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने आणि नऊशे रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. कोतवाली पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा