अजित पवार गटाच्या आमदाराचा अपघात ,  नगर जिल्ह्यातील घटना

शेअर करा

अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या वाहनाला चुकीच्या बाजूने आलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेनंतर अपघातात लहामटे यांच्या वाहनांचे नुकसान झालेले आहे. डॉक्टर किरण लहामटे आणि त्यांचे जोडीदार यांना किरकोळ दुखापत झाली मात्र चिंतेचे काहीही कारण नाही असे आमदार लहामटे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलेले आहे. 

अकोले इथून राजूरला जात असताना ही घटना घडलेली असून ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आलेले आहे. विठे घाटात हा प्रकार घडलेला असून डॉक्टर किरण लहामटे आणि सचिन मंडलिक सोबतच एक चालक असा हा प्रवास सुरू होता. 

सदर घटना समजताच किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली. कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन किरण लहामटे यांच्याकडून करण्यात आलेले आहे. 


शेअर करा