अल्पवयीन भावाने बहिणीला प्रियकरासोबत घरात ‘ रंगेहाथ ‘ पाहिले आणि मग ….

  • by

प्रेमासाठी अडथळा ठरणाऱ्या आणि आपल्या प्रेमप्रकरणाचे बिंग घरी फुटू नये म्हणून तरुणीनं आपल्या लहान भावाचा प्रियकराच्या मदतीनं कायमचा काटा काढला. लहान भावाने आपल्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत घरात एकत्र पाहिलं होतं. हे त्याच्या जीवावर बेतेल आणि त्याचा वाईट काळ बनून येईल याची पुसटशीदेखील त्याला कल्पना नव्हती मात्र निर्दयी बहिणीने आपले प्रेमप्रकरण उघड होऊ नये म्हणून चक्क प्रियकराच्या मदतीने त्याला संपवले.

उपलब्ध माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथल्या बडगोहना गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकरासोबत रंगेहाथ पाहिल्याने या भावानं घरी तोंड उघडू नये अशी भीती या तरुणीला वाटत होती म्हणून प्रियकराच्या मदतीनं तरुणीनं आपल्या सख्ख्या भावाचा जीव घेतला आणि दोघंही फरार झाले. घरी जेव्हा आई-वडील आले तेव्हा त्यांना हा काय प्रकार आहे ते समजेना. मुलगा घरात पडलेल्या अवस्थेत होता. त्यांनी तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला त्यावेळी या चिमुकल्याची हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांना तरुणी पळून गेल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी तपासाची सूत्र त्या दिशेनं फिरवली. आरोपी तरुणी ही १९ वर्षीय असून तिने प्रियकराच्या मदतीनं भावाची हत्या केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे .

प्रियकरासोबत भावाने आपल्याला घरात पाहिलं होतं आणि घरच्यांना सांगेल या भीतीनं त्यांनी जीवे मारल्याची माहिती देखील त्यांनी पोलिसांना दिली असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या असून कारागृहात पाठवलं आहे.