चक्क महामार्गावर एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना भाजपच्या एका नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. मध्य प्रदेशातील या भाजप नेत्याचे नाव मनोहर धाकड असे असून अखेर त्याला आता अटक करण्यात आलेली आहे.
रस्त्याच्या बाजूला चार चाकी गाडी थांबून गाडीचा आडोसा घेत महिलेसोबत अश्लील कृत्य करत असताना तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला होता. विशेष बाब म्हणजे त्याच्या गाडीचा नंबर देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आणि त्यानंतर ही गाडी कुणाची यावरून चर्चा सुरु झाली आणि गाडीमध्ये हाच मनोहरलाल धाकड असल्याचे समोर आले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मनोहरलाल धाकड हा संबंधित महिलेसोबत भररस्त्यात अश्लील कृत्य करत असून त्याच्या या कृत्यानंतर बराच काळ भाजपने मौन बाळगले होते मात्र अखेर सारवासारव करण्यात भाजपला अपयश आले आणि त्यानंतर कारवाई करत अखेर मनोहरलाल धाकड याला अटक करण्यात आली.
मध्यप्रदेश काँग्रेसच्या वतीने मनोहर धाकड याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आक्षेपार्ह आणि अश्लील कृत्याचा निषेध म्हणून काँग्रेसने त्या ठिकाणी जाऊन गंगाजल शिंपडून जागेचे शुद्धीकरण केले. शामगड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष कमलेश जयस्वाल यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ८ व्या लेनवर जाऊन गंगाजल शिंपडून हायवे शुद्ध केला. शुद्धीकरणासाठी गायत्री मंत्राचा जप देखील यावेळी करण्यात आला.