संजय राऊत..अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलत ? : सोनू सूद प्रकरणात मनसेचा निशाणा

शेअर करा

राज्यात कोरोना संकट काळात स्थलांतरित मजुरांसाठी करत काम करत असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या कामावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली. भाजपच्या पाठोपाठ मनसेने देखील या वादात उडी घेतली आहे . काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. आता मनसेने देखील सोनू सूदवरील टिप्पणी प्रकरणात उडी घेतली आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात ,” मा. संजय राऊत, या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलत? ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया… मनाचा मोठेपणा दाखवुया… असो ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार… #बसारडत “

काय म्हणाले होते संजय राऊत?

भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद हा एक अभिनेता आहे. पैसे घेऊन हवे ते संवाद फेकायचे व अभिनय करायचा हा त्याचा पेशा आहे. काही वर्षांपूर्वी ‘कोब्रा पोस्ट’च्या एका स्टिंग ऑपरेशनने सोनू सूदच्या अशाच व्यवहाराचा भांडाफोड केला आहे. सोशल माध्यमांवर इन्स्ट्राग्राम, ट्विटर अकाऊंटवरून छुप्या पद्धतीने भाजपच्या कार्याचा उदोउदो करण्याचे त्याने मान्य केले होते व त्यासाठी महिन्याला ‘दीड कोटी’ इतकी बिदागी त्याने मागितली होती. भारतीय जनता पक्षाचा नेता बनून सूदला भेटलेला ‘कोब्रा’चा प्रतिनिधी व सूदमधील व्यवहार्य संवाद धक्कादायक आहे.

पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे व प्रचार करायचा हे सूदसारख्या अनेकांचे धंदे आहेत. त्यामुळे मजुरांचे दुःख वगैरे पाहून सूद महाशय भावनाविवश झाले, त्यांच्यातल्या माणुसकीची ज्योत फडफडू लागली, यावर कोणी शहाणा माणूस विश्वास ठेवायला तयार नाही. कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय? अशी शंका देखील संजय राऊत यांनी उपस्थित केली होती.

संबंधित बातम्या

… तर भारतात कोरोना रुग्णसंख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका : जागतिक आरोग्य संघटनेचा भारताला इशारा
https://nagarchaufer.com/?p=387

निर्दयतेचा कळस…हत्तीणीनंतर आता भाजपशासित राज्यात गायीला स्फोटके खाऊ घातल्याचा निर्दयी प्रकार
https://nagarchaufer.com/?p=384

भाजप महिला नेत्याची मुजोरी..बाजार समितीच्या सचिवाला चपलेने मारहाण : पहा व्हिडीओ
https://nagarchaufer.com/?p=370

टोळधाडीत देखील संधी .. टोळ पकडून रग्गड पैसे कमावण्याचा बिजिनेस ?
https://nagarchaufer.com/?p=325

सायकल दिनाच्या दिवशीच भारतातील ‘ ह्या ‘ प्रसिद्ध सायकल कंपनीने केले उत्पादन बंद : काय आहे कारण ?
https://nagarchaufer.com/?p=308


शेअर करा