तो म्हणायचा..’ थांब तुझ्या आईची नोकरीच घालवतो ‘ आणि त्यानंतर ..

शेअर करा

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषदेतील एका नराधम शिक्षकाने नापास करण्याची तसेच तिच्या आईची नोकरी घालवण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर मदन वानखेडे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत पीडित मुलगी शिकत असून तिची आई देखील शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहे. मदन वानखेडे हा पीडित अल्पवयीन मुलीवर 2016 पासून अत्याचार करीत होता. पीडित मुलीला तुला नापास करेन आणि तुझ्या आईची नोकरी घालवेन, अशी धमकी देऊन हा नराधम शिक्षक तिच्यावर सलग चार वर्षे शारीरिक अत्याचार करीत होता.

त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर न घाबरता या मुलीने आपल्यासोबत घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानंतर माणगाव पोलीस स्टेशनमध्ये मदन वानखेडे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकावर माणगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर माणगाव पोलिसांनी या प्रकरणात शिक्षक मदन वानखेडे याला अटक केली आहे. मदन वानखेडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


शेअर करा