मोबाईलवर पाहून लॉजमध्ये सुरु होते ‘ नको ते ‘ , असा झाला प्रियकराचा मृत्यू

शेअर करा

मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून त्यात दाखवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्स पोझिशनमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला जोरदार गळफास बसला आणि त्याचा त्या लॉजमध्येच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे.तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर ह्या सर्व प्रकारचे बिंग फुटले.

उपलब्ध माहितीनुसार, सदर घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर घडली आहे. मृतक तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर असून सध्या बेरोजगार असल्याची माहिती पुढे आली आहे. मृतक तरुणाचे गेल्या काही दिवसांपासून 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघांनीही शुक्रवारी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव परिसरात असलेल्या लॉज वरील एक खोली बुक केली.

लॉजमध्ये गेल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पाहून त्यात दाखवल्याप्रमाणे त्यांनी दोरीचा वापर केला होता. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले आले आणि त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा आवळण्यात आली होती. या पोजिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर तरुणी बाथरूममध्ये गेली मात्र तो तरुण तश्याच दोरी बांधलेल्या अवस्थेत होता,अशातच खुर्ची खाली कोसळली आणि त्याच्या गळ्याला फास बसला.

प्रेयसी जेव्हा बाथरूमच्या बाहेर आली तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली.त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.


शेअर करा