टिकटॉक बॅन करा म्हणणारे आता तोंड कुठे दडवणार ? केंद्र सरकारने दिला ‘ असा ‘ झटका ?

शेअर करा

केंद्र सरकारच्या कथनी आणि करणीमधील फरक आता स्पष्ट होऊ लागला असून एकीकडे आत्मनिर्भरचा डांगोरा पिटवून अप्रत्यक्षपणे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचेच आवाहन करायचे तर दुसरीकडे मात्र स्वतः लोकांपुढे कोणताच आदर्श निर्माण करायचा नाही , असे केंद्राचे दुट्टप्पी धोरण आता लोकांच्या देखील लक्षात येऊ लागले आहे. मोदींच्या ‘आत्मनिर्भर’ वरून तमाम भाजपचे नेते आणि ट्रॉलर्स आपल्या फोनमधून टिकटॉक काढून टाकण्याचे आवाहन करत असताना दुसरीकडे मात्र चक्क केंद्र सरकारनेच चीनच्या मालकीच्या असलेल्या टिकटॉकवर आपले अकाऊंट सुरु केले असल्याने आधी जे टिकटॉक काढून टाका, असे आवाहन करत होते ते तोंडघशी पडले आहेत.

भारत विरुद्ध चीनमधील तणावामुळे टिक-टॉक मागील एका महिन्याहून अधिक काळापासून चर्चेत आहे. अनेकांनी चीनी बनावटीचे असलेल्या या अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून लावून धरली आहे . बॅन टिक-टॉकपासून ते अगदी या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी भारतीय पर्याय म्हणून मित्रों नावाचे अ‍ॅप प्ले स्टोअरवर दाखल होण्यापर्यंत अनेक घडामोडी मागील काही आठवड्यांमध्ये घडल्या आहेत. एकीकडे भारतीय नेटकरी या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी करत असतानाच थेट भारत सरकारनेच या प्लॅटफॉर्मवर आपले अकाउंट सुरु केलं आहे. त्यामुळे असे आवाहन करणारे नेटकरीही संभ्रमात पडले आहेत. टिक-टॉक हे चीनमधील ‘बाइट डान्स’ या कंपनीच्या मालकीचे अ‍ॅप आहे. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी हे ऐप काढून टाका असे आवाहन सोशल मीडियामधून गेल्या कित्येक दिवसापासून भाजप समर्थित फेसबुक पेजेस तसेच व्यक्तींच्या मार्फत केले जात होते .

भारत सरकारने @mygovindia या हॅण्डलसहीत या चीनी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. पदार्पणानंतर अवघ्या काही तासांमध्ये या अकाउंटला ८ लाख ९२ हजारहून अधिक टिक-टॉकर्सने फॉलो केलं आहे. आता थेट भारत सरकारनेच या प्लॅटफॉर्मवर अधिकृत अकाउंट सुरु केलं आहे.या अकाउंटचे स्क्रीनशॉर्ट आता व्हायरल झाले आहेत.. विशेष म्हणजे हे अकाउंट व्हेरीफाईड असल्याचा मार्क देखील यावर आहे. केंद्र सरकारकडून याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

https://twitter.com/ArunSFan/status/1268933998975180800

एका बाजूला भारतीय नेटकरी चीनी सॉफ्टवेअरला विरोध करत असतानाच दुसरीकडे थेट सरकारनेच अशाप्रकारे या प्लॅटफॉर्मवर पदार्पण केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील याबद्दल सरकारला निशाण्यावर घेताना ” Wait a minute, who’s there on Tik Tok? Government of India? 😧 ” असे ट्विट केले आहे .


शेअर करा