घरी न सांगता केलेल्या वनिताच्या ‘ तसल्या ‘ फोटोशूटवर तिच्या घरचे म्हणाले …

शेअर करा

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात शाहिद आणि त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर चित्रीत करण्यात आलेला एक सीन लोकांना प्रचंड आवडला होता. कबीर सिंग सिनेमात हातातून काचेचं ग्लास तुटल्यावर शाहिद कपूर मोलकरणीच्या मागे रागात धावात जातो. हा सीन संपूर्ण सिनेमात प्रचंड गाजला होता. वनिताने सिनेमात मोलकरणीची भूमिका साकारली होती. वनिताचा जन्म मुंबईत झाला असून तिचं संपूर्ण शिक्षण आणि करिअर मुंबईमधलंच आहे.

सध्या वनिता तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे. २०२१ च्या एका कॅलेन्डरसाठी तिने सकारात्मक संदेश देणारं एक बोल्ड फोटोशूट केलं. यात ती आपल्या शरीराचा तिला अभिमान असल्याचं सांगते. यासोबतच शरीराचा आकार किंवा रंग याचा फारसा परिणाम तिच्यावर होत नसल्याचंही सांगितलं. सध्या तिच्या याच फोटोशूटचं सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे वनिताने हे फोटोशूट करण्याआधी आपल्या आई- बाबांना याची कोणतीच कल्पना दिली नव्हती.

वनिता या फोटोशूटबद्दल बोलताना म्हणाली की, ‘खरं सांगायचं तर मी आई- वडिलांना याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. सर्व काम पूर्ण झाल्यावर मी त्यांना सांगितले आणि माझा फोटो दाखवला. त्यांनीही या सर्व गोष्टी सकारात्मकतेने घेतल्या. त्यांना माहीत आहे की हे माझे काम आहे आणि ते देखील म्हणाले की ते आपल्या कामाचा एक भाग आहे. उलट त्यांनीच मला सांगितलं की फोटो खूप सुंदर आला असून त्यात वाईट असं काहीच नाही.’

वनिता खरात पुढे म्हणाली की, ‘ अशा फोटोशूटची अभिजीत पानसे यांची संकल्पना होती. मी त्यांना आधीपासूनच ओळखत होते. आपण सारेच सुंदर दिसतो अशी या कॅलेन्डरची संकल्पना आहे. कोणत्याही मुलीला किंवा स्त्रीला तिचं वजन जास्त असल्याची लाज वाटू नये. या फोटोशूटद्वारे आपल्या शरीराविषयी सकारात्मक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी, गोरं होणं किंवा सडपातळ असण्याची आवश्यकता नाही.


शेअर करा