प्रेमात पडली तेव्हा हिंदू नाव मात्र प्रत्यक्षात मुस्लिम.. लग्न झाल्यावर म्हणतोय की ?

  • by

टीव्ही अभिनेत्री प्रिती तलरेजा हिने तिचा नवरा अभिजीत पेटकर याच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यासोबतच प्रितीने त्याच्याविरूद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. प्रितीने दिलेल्या जबाबानुसार तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता. जेव्हा तिने धर्मांतर करण्यास नकार दिला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. प्रितीच्या म्हणण्यानुसार तिचा नवरा हा मुस्लिम धर्माचा आहे, ही गोष्ट त्याने आपल्यापासून लपवून ठेवली होती.

प्रितीने घरगुती हिंसाचाराबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती पण अभिजीत विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमओ यांना टॅग करून यासंबंधी मदत करण्याची विनंतीही केली होती. या प्रकरणात मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आता खडकपाडा कल्याण पोलिसांनी प्रितीच्या तक्रारीवरून पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

टीव्ही अभिनेत्री प्रिती तलरेजाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले. यात तिच्या चेहऱ्यावर मारहाण केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. प्रितीच्या एफआयआरची एक प्रत सुनैना होले यांनी शेअर केली आहे. तसंच भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि किरीट सौमैया यांनी मदत केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.अभिजीत पेटकर याने मुस्लिम धर्मात धर्मांतर केल्याचा देखील ह्या पोस्टमध्ये उल्लेख आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

तीन वर्षांपूर्वी प्रितीने अभिजीत पेटकरशी लग्न केलं. अभिजित हा एका जिमचा मालक आहे. आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये प्रितीने लिहिले की अभिजीत मुस्लिम धर्माचा आहे. दोघांचं लग्न मशिदीत झालं होतं. प्रितीने लग्नानंतर धर्मांतर केले नाही. अभिजीतने प्रिती धर्मांतर करत नसल्याचं कळल्यानंतर वारंवार मारहाण करायला सुरुवात केली. यासोबतच धर्मांतर न केल्यामुळे प्रितीला मुस्लिम कायद्यानुसार लग्नाचं प्रमाणपत्र देण्यास देखील नकार देण्यात आला .

एका ट्विटमध्ये प्रितीने लिहिले की तिचा नवरा अभिजीत याने तो मुस्लिम असल्याचं सांगितलं. पण त्याच्याकडे धर्मांतर केल्याचे कोणतेही कागदपत्र नाही. तो त्याच्या कागदपत्रांवर अभिजित पेटकर हेच नाव लिहितो. तीन वर्षांपासून तो प्रेमाच्या नावाखाली तिची फसवणूक करत आहे. दरम्यान, प्रिती तलरेजा ही टीव्ही मालिका कृष्णादासीमध्ये दिसली होती.