लज्जास्पद…हळदीचा कार्यक्रम ऐन रंगात आला असता नवरदेवाचा बाप मात्र…

  • by

लग्न होतात तेच मुळात एकमेकांवर विश्वास असतो म्हणून मात्र या विश्वासास तडा देणारी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे . लग्न समारंभातच झालेल्या या चोरीच्या घटनेत नवरदेवाच्या बापानेच आपल्या मेहुणीचे दागिने लंपास केले आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील घुलेनगरमध्ये राहणाऱ्या दत्ता गोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

उपलब्ध माहितीनुसार, गोरे यांच्या मुलाचे वडगाव बुद्रुक परिसरात लग्न होते. जिचे दागिने चोरीला गेले ती महिला देखील या लग्नाच्या कार्यक्रमाला आली होती. ती गोरे यांची नात्याने मेहुणी आहे. त्यांना दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी जायचे होते. त्यामुळे त्यांनी भावाच्या घरी सोन्याचे दागिने ठेवले होते. हळदीच्या कार्यक्रमाला ती गेल्यानंतर गोरे हा घरात शिरला. त्याने कपाटातील जवळपास अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास केले.

महिला आणि तिचा भाऊ घरी परतल्यानंतर त्यांना कपाटातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गोरे याला ताब्यात घेतले. दागिने चोर हा नवरदेवाचा बाप निघाल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.