डुबलेला रोजगार कोरोनाचा हाहाकार, पेट्रोल डिझेल पुन्हा महाग : काय आहेत आजचे दर ?

शेअर करा

कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत आधीच डुबलेला रोजगार आणि महागाई याच्या अडचणी समोर असताना आज सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ झाली आहे. . मंगळवारी (9 जून) पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. दिल्लीत आज पेट्रोल 54 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे दिल्लीकरांना पेट्रोलसाठी 73 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 58 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 71.17 रुपयांवर गेला आहे.

मुंबईतही पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 52 पैशांनी तर डिझेलचे दर 55 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 80.01 रुपये आणि 69.92 रुपये मोजावे लागतील. गेल्या 80 दिवसांत पहिल्यांदा रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा महाग झाले आहे.

सरकारने 14 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये वाढ केली, मात्र तेल कंपन्यांनी ही वाढ ग्राहकांवर न टाकता स्वत: सोसून सरकारचा भरणा केला होता मात्र आता परतफेड कंपन्यांनी सुरु केली की काय ? अशी परिस्थिती तयार झालेली आहे . आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिजतेलाच्या किमती काही दिवसांपूर्वी दोन दशकामधील नीचांकी आल्या असताना आपण त्यावेळी कच्च्या तेलाचा साठा करू शकलो नाही, त्याचे परिणाम म्हणून ही झळ सर्व नागरिकांना सोसावी लागणार आहे.


शेअर करा