नगर महापालिकेला काँग्रेसचा असा ‘ डोस ‘ की अखेर ते होर्डिंग हटवले : व्हिडीओ पहा

  • by

एके काळी नगर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या लालटाकी येथील उद्यानातील पंडित नेहरू यांचा पुतळा परिसरातील अतिक्रमणे आणि होर्डिंगबाजीमुळे पूर्णतः झाकला गेला होता. सदर परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे आणि होर्डिंगच्या विरोधात अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली होती. अहमदनगर महापालिकेस सदर अतिक्रमणे आणि होर्डिंग काढून घेण्यासाठी महापालिकेला शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. अखेर महापालिकेचे डोके ठिकाण्यावर आले असून लालटाकी येथील पंडित नेहरू याच्या पुतळ्यास अडथळा ठरणारे हे होर्डिंग हटवण्यात आले आहे मात्र सदर होर्डिंगला परवानगी देणारे अधिकारी यांच्यावर काय कारवाई झाली आहे ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव दत्तात्रय गाढवे यांच्यासह गीते प्रवीण शरद, शिरवाळे ऋत्विक नाना, जगताप सुजित बापूसाहेब, कारंडे सिद्धार्थ सुभाष,गायकवाड राज संदीप, जयस्वाल योगेश सुरेंद्र, शेख साहिल मुनीर, घोरपडे मयूर शंकर, गुलदगड सोमनाथ बाळासाहेब, ओम संजय विश्वकर्मा, अमन पासवान , आदित्य तोडमल व जयदीप शिंदे यांनी हे निवेदन महापालिकेला दिले होते

महापालिकेला दिलेल्या निवेदनात काय म्हटले होते ?

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केले असे काँग्रेसचे नेते स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांचा लाल टाकी याठिकाणी गेले अनेक वर्षापासून पुतळा आहे. सदर पुतळ्याची दैन्यावस्था झालेली असून परिसरांमध्ये देखील अनिष्ट प्रवृत्तीचे लोक त्याठिकाणी दुष्कृत्य करताना कायम आढळून येत असतात सदर ठिकाणी स्वच्छता देखील नसते आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

एकेकाळी नगर शहराच्या दर्शनी भागाच्या ठिकाणी असणाऱ्या या पुतळ्याचा परिसर हा नागरिकांच्या आकर्षणाचे आणि आस्था व श्रद्धेचे ठिकाण म्हणून परिचित होते आणि याठिकाणी पाण्याचा झरा आणि कारंजे सुरू असायचे आणि हिरवळ देखील असायची मात्र आता हे केवळ आठवणी पुरतेच राहिलेले आहे ही अत्यंत खेदाची आणि संतापजनक बाब आहे या परिस्थितीत महानगरपालिका अहमदनगर ही सर्वस्वी जबाबदार आहे.

महापालिकेच्यावतीने जाहिरातीचे होर्डिंग लावण्यासाठी परवाने दिले जातात. सदर पुतळा रस्त्यावरून पूर्वी सहजपणे दिसायचा परंतु आता या पुतळ्याच्या आवारात भिंतीवरती चार मोठे जाहिरातीचे होर्डिंग व्यावसायिक उपयोजनासाठी उभे करण्यात आले आहेत त्यामुळे सदर पुतळा पूर्णतः झाकला गेला असून सदर परिसरात दुष्कृत्य करणाऱ्यांना यामुळे प्रोत्साहन मिळत आहे.

सदर होर्डिंगला महापालिकेची परवानगी आहे की नाही ही या बाबीचा शोध घेणे आवश्यक असून परवानगी नसेल तर सदर होर्डिंग तातडीने काढून घेण्यात यावेत तसेच परवानगी देण्यात आली असेल तर ज्या अधिकाऱ्याने अत्यंत हलगर्जीपणाचे कृत्य करून, स्वर्गीय पंडितजींच्या पुतळ्याला झाकून टाकण्यास कारणीभूत असणाऱ्या कामासाठी परवानगी दिल्याबद्दल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. तशी परवानगी दिली असल्यास ही परवानगी तातडीने रद्द करून सदर होर्डिंग हे सात दिवसाच्या आत महापालिकेने काढून घ्यावे.

पंडित जवाहरलाल नेहरू हा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असून महापालिकेच्या सदर कृत्यामुळे काँग्रेस जनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याची नोंद कृपया महापालिकेने घ्यावी.सात दिवसाच्या आत कारवाई न केल्यास सदर फलक काढून घेण्यासाठी अहमदनगर शहर काँग्रेस विद्यार्थी काँग्रेस ( एनएसयुआय ) विभागाच्या माध्यमातून सदर होर्डिंग काढून टाकण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जाईल याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती