खाजगी चालत्या बसमध्ये ‘ भलताच प्रकार ‘, पुण्यात येताच तरुणीने…

  • by

नागपूरवरून पुण्याला येणाऱ्या 21 वर्षीय युवतीवर चालत्या खाजगी बसमध्ये दोन वेळा बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून बलात्कार खाजगी बसच्या क्लिनरने केल्याचे सदर तरुणीचे म्हणणे आहे . संबंधित खाजगी बसच्या क्लिनरने चाकूचा धाक दाखवून युवतीवर प्रवासात दोनवेळा बलात्कार केला आणि घडलेली घटना कोणाला सांगितली तर चालत्या बसमधून बाहेर फेकून देण्याची देखील धमकी दिली, असे या तरुणीचे म्हणणे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी खाजगी बसने प्रवास करत होती. बसमध्ये चढल्यानंतर बराच वेळ उभे राहून प्रवास केल्यानंतर क्लिनरने तिला बसच्या मागच्या शीटवर बसण्यास सांगितल आणि संधीचा फायदा घेऊन चाकूचा धाक दाखवत तिच्यावर चालत्या बसमध्ये दोन वेळा बलात्कार केला. सदर प्रकारानंतर याबाबत कोणाला सांगितल्यास चालत्या बसमधून फेकून देवू, अशी धमकीही संबंधित आरोपी क्लिनरने पीडित युवतीला दिली. 5 जानेवारी रोजीची ही घटना आहे.

बस पुण्यात पोहचल्यानंतर पीडित युवतीने पुण्याजवळील रांजणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित गुन्हा हा मालेगाव परिसरात घडला असल्याने पुणे पोलिसांनी हा गुन्हा मालेगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित खाजगी बस पुण्यातून जप्त केली आहे.

पीडित तरुणी मुळची गोंदिया जिल्ह्यातील रहिवाशी असून ती पुण्या जवळील कारेगाव येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. युवतीने तक्रार दाखल केल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तिला तिच्या घरी पाठवण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.सध्या आरोपी क्लिनर फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक विशेष पथक नागपूरकडे रवाना झालं आहे.