केवळ प्रेयसीचा बदला घेण्यासाठी ‘ ह्या ‘ मॅनेजरची अशीही विकृती मात्र अखेर ……

शेअर करा

एका मोठ्या कंपनीत कामावर असताना देखील कोणतीही आर्थिक अडचण नसताना केवळ आपल्या प्रेयसीचा बदल घेण्याच्या उद्देशाने एक व्यक्तीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साइट्सवर विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. प्रेयसीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवली आणि ह्या आरोपीस गजाआड करण्यात यश आले. नोएडा येथील ह्या घटनेत पोलिसांना चक्क कोलकाता इथे जाऊन आरोपीस जेरबंद करायचे होते मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने ह्या आरोपीस अटक करण्यात आली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला दोघेही गेल्या काही वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये भेटले होते. दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला, मग येथून त्यांची रिलेशनशिप सुरु झाली. दोघेही जवळपास 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. या काळात आरोपीने महिलेला व्हाट्सएप्पवर काही अश्लील फोटो, व्हिडिओ मागितले आणि ती त्याच्या प्रेमात आंधळी झाली असल्याने तिने देखील ह्या गोष्टी त्याच्याशी शेअर केल्या मात्र काही कालावधीनंतर दोघांमध्ये काही गोष्टीवरुन भांडण झाले आणि दोघांचा ब्रेकअप झाला. पुढे जाऊन महिलेने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. दरम्यान, आरोपीची पोस्टिंग नोएडा येथून कोलकाता येथे झाली आणि आरोपीने त्या महिलेसोबत सूड उगवण्याच्या उद्देशाने तिचे अश्लिल फोटो विकण्याचे काम सुरू केले. सदर साइट्सकडून तो ई-वॉलेटमधून पैसेही घेत असल्याचे उघड झाले आहे.

आरोपी पश्चिम बंगालमधील बारुईपूर येथे होता. यानंतर पोलीस ठाण्याचे पथक पश्चिम बंगालमध्ये गेले आणि आरोपीस अटक करून कोलकाताहून आणले आहे. आरोपी हा नॅशनल कंपनीत एरिया मॅनेजर आहे. याआधी आरोपी लखनऊ व इतर शहरांमध्ये राहत होता. या गुन्ह्यात आरोपीच्या काही साथीदारांचा देखील सहभाग असल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


शेअर करा