नवऱ्याच्या गळ्यात कुत्र्याचा बेल्ट बांधून महिला रस्त्यावर, पोलिसांना म्हणाली की ..

  • by

संचारबंदी किंवा इतर कोणतेही नियम लागू केले की त्याचं उल्लंघन करण्यात काही लोकांना मोठा आनंद मिळत असतो, ही मानवी प्रवृत्ती जगभर सर्वत्र सारखीच असल्याचे स्पष्ट करणारी एक घटना कॅनडा इथे उघडकीस आली आहे. कॅनडात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट वेगानं पसरत असून या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तिथं लॉकडाउनची मुदत वाढवण्यासह संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

कॅनडामधील क्युबेक प्रांताचे प्रीमियर फ्रेंकॉइस लेगाल्ट यांनी इथं रात्री 8 वाजल्यापासून सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तिथंही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी 9 जानेवारी रोजी रात्री संचारबंदी दरम्यान क्युबेक प्रांतात एक अतिशय विचित्र घटना निदर्शनास आली. त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र सोशल मीडियात होत असून इथे चक्क एका बायकोने नवऱ्याच्या गळ्यात कुत्र्याचा बेल्ट घालून फिरवले.

क्यूबेकमध्ये रात्री आठ वाजता संचारबंदी लागू झाल्यानंतर तासाभरानं रात्री नऊच्या सुमारास पोलिसांना एक महिला रस्त्यावर फिरताना दिसली. तिच्याबरोबर तिचा पतीही होता; पण त्याला ती चक्क कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा बांधून, तो आपल्या हातात पकडून आपल्याबरोबर चालवत होती. हे दृश्य बघून पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी तिला संचारबंदी असताना घराबाहेर पडण्याचं कारण विचारलं असता, तिनं संचारबंदीत घराबाहेर एक किलोमीटरच्या अंतरापर्यंत कुत्र्यांना फिरवण्यास परवानगी असल्याचं सांगितले, त्यामुळे तिने केलेला असला ‘ जुगाड ‘ पाहून पोलिसांनी तिला दंड आकारला.

क्युबेकमध्ये शनिवारपासून संचारबंदी लागू केली असून, लॉकडाउनची मुदत 8 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. संचारबंदी दरम्यान, जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले असून, लोकांना घरगुती कार्यक्रमसुद्धा करण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि इथली आरोग्य व्यवस्था कार्यक्षम करण्यासाठी अशी शॉक ट्रीटमेंट करणं आवश्यक ठरल्याचं या प्रांताचे प्रीमियर फ्रेंकोइस लेगाल्ट यांनी सांगितले आहे.