नगरमध्ये लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास , ‘ ही ‘ आहेत लक्षणे

शेअर करा

काल करोनावरील लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.महापालिका रुग्णालयातील दोघींचा तर जिल्हा रुग्णालयातील एका परिचारिकेचा यात समावेश आहे.

काल दुपारी लस घेतल्यानंतर या तीन परिचरिकांना थंडी, ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ, उलट्या, चक्कर येणे असे त्रास होऊ लागला. त्यामळे त्यांना रात्रीच जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले. ज्यांना लस घेतल्यावर त्रास झाला अशा रुग्णांसाठी तेथे १२ खाटांचा खास कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आज लसीकरण बंद असून यापुढे एक दिवसाआड लस देण्यात येणार आहे.

काल राज्यातील विविध जिल्ह्यांत आरोग्यसेवकांना प्राधान्यानं लस देण्यात आली. नगर जिल्ह्यात १२ केंद्रावर लसीकरण करण्यात आले. पहिल्या दिवशी १२०० जणांना लस देण्यात येणार होती. प्रत्यक्षात फक्त ८७१ जणांनी उपस्थित राहून लस टोचून घेतली. लसीकरणानंतर संबंधितांना अर्धा तास केंद्रावर ठेवल्यानंतर घरी सोडण्यात आले. लस घेतलेल्यांपैकी दोघींना रात्री तर एकीला आज सकाळी त्रास सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात आणले गेले. जिल्ह्यात लस घेतलेल्या अन्य कर्मचाऱ्यांवरही प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.


शेअर करा