होय.. आम्हाला गुटखा नि दारू पण मिळतेय : कोविड सेंटरच्या सुविधांबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना तळीरामांचे उत्तर

शेअर करा

एकीकडे राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेलेली असताना दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेचा गलथान कारभार देखील समोर येत आहेत . कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला म्हणून चक्क ओली पार्टी साजरी करण्याचा मोह कोविड सेंटरमधील लोकांना आवरला नाही मात्र अतिउत्साहात हा व्हिडीओ शूट झाला आणि काही वेळातच व्हायरल झाला.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील कोविड सेंटरची ही घटना आहे, कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचा आनंद साजरा करताना दारू-मटणाची ओली पार्टी झाली. याचवेळी गाणी लावून चक्क झिंगाट डान्स करण्यात आला .दरम्यान ह्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .

महागाव येथील एका सुवर्णकाराचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे त्याची पत्नी, मुली, नातेवाईक व संपर्कात आलेल्या सुवर्णकार बांधव व इतरांना महागावच्या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते, मात्र त्यांना घरून डबा आणण्याची सुविधा देण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी मृताच्या संपर्कातील ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले त्याचा उत्साह आनंद साजरा करण्यासाठी ही पार्टी केल्याचे बोललं जातंय. घरून डबा आणण्याच्या सुविधेचा त्यांनी गैरफायदा उचलला आणि चक्क अंगावर घालायच्या कापडांमध्ये गुंडाळून दारू तर घरच्या डब्यातून मटण आयात करण्यात आले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडला.

हा व्हिडिओची दखल घेऊन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह स्वत: महागावात दाखल झाले आणि त्यांनी कोविड सेंटरला भेट दिली. तुम्हाला सर्व सोयीसुविधा मिळतात का, असे विचारले असता निगेटिव्ह अहवाल आलेल्यांनी आम्हाला दारू, गुटखाही मिळतो असे सांगितले, यामुळे जिल्हाधिकारी आणखीच संतापले. अशा धक्कादायक प्रकारास जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या

… तर भारतात कोरोना रुग्णसंख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका : जागतिक आरोग्य संघटनेचा भारताला इशारा
https://nagarchaufer.com/?p=387

निर्दयतेचा कळस…हत्तीणीनंतर आता भाजपशासित राज्यात गायीला स्फोटके खाऊ घातल्याचा निर्दयी प्रकार
https://nagarchaufer.com/?p=384

भाजप महिला नेत्याची मुजोरी..बाजार समितीच्या सचिवाला चपलेने मारहाण : पहा व्हिडीओ
https://nagarchaufer.com/?p=370

टोळधाडीत देखील संधी .. टोळ पकडून रग्गड पैसे कमावण्याचा बिजिनेस ?
https://nagarchaufer.com/?p=325

सायकल दिनाच्या दिवशीच भारतातील ‘ ह्या ‘ प्रसिद्ध सायकल कंपनीने केले उत्पादन बंद : काय आहे कारण ?
https://nagarchaufer.com/?p=308


शेअर करा