… अखेर सीरम इन्स्टिट्युटमध्ये ‘ जीवितहानी ‘, आगीत गेले इतके बळी ?

  • by

करोना लसीकरणामुळं सध्या चर्चा सुरु असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.विद्युत बिघाडामुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आतापर्यंत या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे. ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिली आहे.

हडपसरजवळ गोपाळ पट्टीमध्ये असणाऱ्या सीरम प्लांटला आग लागली असून याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधित केलेली लस कोविशील्ड नावाने सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत आहे. कोविशील्ड लशीचा स्टॉक सुरक्षित आहे. आगीचा कोणता धोका पोहोचलेला नाही, असा दावा करण्यात येत आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागली, अशीही माहिती मिळते आहे. मात्र करोनाची लस याठिकाणी तयार करण्यात येत असल्याने सर्व यंत्रणांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या बीसीजी लशीचा प्लांट असलेल्या इमारतीमध्ये आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे.

पुण्याच्या माजी महापौर आणि भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. “दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही, त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी नाही. हा घातपाताचा प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी वाटतंय. कारण ज्या ठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याची मला शंका आहे” .

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून पुण्याला जाऊन सीरम इन्स्टिट्यूटमधील आग लागलेल्या घटनास्थळाला भेट देणार आहेत. अजित पवारांनी आग लवकरात लवकर विझवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून दूरध्वनीवरुन परिस्थितीची माहिती घेतली. संस्थेतली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत करण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही आगीची दखल घेण्यात आली असून गृह विभागाला आगीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. देशात या लसीच्या आपत्कालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोव्हिशील्ड लसीचे डोस 11 जानेवारीला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लसीचे काही डोस देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये रवाना करण्यात आले होते.