सततच्या ब्लॅकमेलला वैतागून ती गाडीवर बसली खरी मात्र त्यानंतर …

  • by

गेल्या कित्येक दिवसांपासून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल केले जात होते, अशातच ती अचानकपणे घरातून गायब झाली आणि अखेर बेपत्ता झालेल्या या अल्पवयीन मुलीचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळला. उत्तर प्रदेशातील अलीगढमधील हरदुआगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून अपहरण करून मुलीची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तीन तरूण तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत होते. शारीरिक संबंध न ठेवल्यास अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील ते देत होते, असा देखील आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, भटौला गावातील संकेत नावाच्या तरुणाने लग्नाच्या भूलथापा देऊन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. त्याचे मित्र राहुल आणि हिमांशू हे देखील त्या मुलीला धमकावायचे आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिला ब्लॅकमेल करत होते. त्यामुळे मुलगी गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होती. मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संकेत आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून मुलीला तीन ते चार वेळा फोन केले होते त्यामुळे त्रस्त झालेली मुलगी दुपारी एक वाजताच्या सुमारास अलीगढला जाण्याचा बहाणा करून घरातून बाहेर पडली. गावाबाहेर आधीपासून तिघे आरोपी दुचाकी घेऊन उभे होते. त्यांनी मुलीला दुचाकीवर बसवले आणि अज्ञात स्थळी घेऊन गेले .गावातीलच राघवेंद्र पाल या व्यक्तीने ही माहिती मुलीच्या कुटूंबियांना दिली आहे. त्यानंतर रेल्वे रुळांवर मुलीचा मृतदेह सापडला. तिचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.