अखेर ‘ ती ‘ हत्या अनैतिक संबंधातूनच, महिला ६० वर्षीय अन आरोपी ३३ वर्षीय

  • by

गेल्या काही दिवसांपूर्वी साताऱ्यात कृष्णानगर इथे 60 वर्षीय महिलेचा खून झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. सदर महिला ही मराठी चित्रपट सृष्टीशी संबधित असल्याने पोलीस देखील कसून तपास करत होते मात्र अखेर हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. कृष्णानगर परिसरात १६ जानेवारीला सकाळी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून अज्ञात व्यक्तीने सदर महिलेचा खून केला होता. संबंधित महिलेच्या ओळखीतील संभाजीनगर येथे राहणाऱ्या व्यक्तीने अनैतिक संबंधातून खून केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी संशयित आरोपी 33 वर्षीय अनंत दाजीबा पेढणेकर (वय 33, सध्या रा. संभाजीनगर, मूळ रा. चंदगड, जि. कोल्हापूर ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मृत महिला अनेक छोट्या मोठ्या मराठी मालिकांमध्ये काम करत होती. एका प्रवासादरम्यान अनंत व महिला यांची ओळख झाली होती. तो दोन- तीन वेळा त्यांच्या घरी येऊन गेला होता. महिला घरी एकटी राहत असल्यामुळे संशयित आरोपी सोबत प्रेमसंबंध तिचे जुळले होते. या प्रकरणात मृत महिलेने संशयित आरोपीला तिच्यासोबत घरातच राहण्याचा तगादा लावला होता. त्यातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात संशयित आरोपी अनंत पेडणेकरने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

सदर महिलेची शनिवार 16 रोजी मध्यरात्री राहत्या बंगल्यामध्ये अज्ञाताने गळा चिरून हत्या केली होती. या घटनेमुळे कृष्णानगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. शहर पोलीस ठाण्यातील दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक या खून प्रकरणाचा तपास करत होते. पीडित महिलेच्या मोबाईलवर वारंवार फोन करणा-या व्यक्तींचीही पोलिसांनी कसून चौकशी केली.

यातूनच काही महत्त्वाची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अनंत पेडणेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने टोलवाटोलवी करत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने क्षणाचाही विलंब न करता खुनाची कबुली दिली. अनैतिक संबंधातून खून केल्याचे पेडणेकरने पोलिसांना सांगितले. कारवाईत शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, संदीप आवळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, विशाल धुमाळ हे सहभागी होते.