महाराष्ट्र सरकारला सर्कस म्हणणाऱ्या राजनाथ सिंह यांचा ‘ शेलक्या ‘ शब्दात समाचार : काय म्हणाले शरद पवार ?

शेअर करा

राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार नसून सर्कस सुरु आहे असा टोला राष्ट्रवादीला लगावला होता, त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे . सध्या शरद पवार हे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांना कोकणामध्ये जाऊन भेट देत आहेत. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना राजनाथ सिंह यांच्या टिकेबद्दल विचारले असताना शरद पवार म्हणाले, ” आमच्या सर्कसीत प्राणी आहे फक्त विदूषकाची कमतरता आहे ” . शरद पवार यांच्या मिश्किल वक्तव्याने येथील पत्रकारांमध्ये देखील हशा पिकला .

गेल्या २ दिवसांपासून शरद पवार हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांना शरद पवार भेटी देत आहेत. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, आमच्या सर्कसीत प्राणी आहे फक्त विदूषकाची कमतरता आहे अशा शब्दात त्यांनी राजनाथ सिंहावर टीका केली. त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.

तर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनीही राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोरोनाबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने देखील (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) कौतुक केले आहे. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार आहे. हे सरकार उत्तम काम करतंय. लोकशाही मार्गानं चालणाऱ्या या सरकारला रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत अशा शब्दात नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांना टोला हाणला होता .


शेअर करा