भारतातील कोरोनासंदर्भात झोप उडवणारी बातमी : धक्कादायक आकडेवारी आली बाहेर ?

शेअर करा

देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जून महिन्यात दररोज ८ ते १० हजार रुग्ण आढळून येत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास अमेरिकेहून भयावह परिस्थिती भारतात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . जवळपास दोन महिने लॉकडाऊन ठेवून देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेच आहे . भाजपचे नेते आणि केंद्र सरकार सध्या बिहार आणि पश्चिम बंगालच्या प्रचारात व्यस्त असल्याने त्यांना इकडे लक्ष देण्यास वेळ नाही मात्र हाती आलेली आकडेवारी झोप उडवणारी असून भारतात आतापर्यंत फक्त ५० लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात हा आकडा अतिशय कमी आहे .

अमेरिकेने आतापर्यंत २.१८ कोटी, रशियानं १.१३ कोटी, तर ब्रिटननं ५९ लाख चाचण्या घेतल्या आहेत. चाचण्यांचा आकडा पाहिल्यास भारत ब्रिटनच्या जवळ आहे. मात्र अमेरिका, रशियाच्या खूप मागे आहे. मात्र ब्रिटनची लोकसंख्या फक्त ६. ६६ कोटी असून भारताची लोकसंख्या त्याच्या जवळजवळ २० पट आहे.

इतक्या कमी चाचण्या घेऊन देखील देशातील कोरोना रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांच्या पुढे गेली आहे. प्रति लाख किंवा प्रति १० लाखामागे किती रुग्ण, किती मृत्यू यावरून देशातल्या कोरोना संकटाची तीव्रता लक्षात येते. त्याच निकषानं पाहिल्यास ५० लाख चाचण्या घेणारा भारत जगातल्या पहिल्या १३० देशांतही येत नाही. कमी चाचण्या घेऊन आकडे कमी दिसणार हे वास्तव आहे मात्र त्याने कोरोनावर मात करता येईल का ? हा देशापुढील गंभीर प्रश्न आहे .

वर्ल्डोमीटरनं दिलेल्या मंगळवारपर्यंतच्या माहितीनुसार, भारतानं एक लाख लोकसंख्येमागे ३५६ कोरोना चाचण्या केल्या आहेत. पाकिस्ताननं ३३१, तर बांगलादेश २५८ चाचण्या केल्या आहेत. शेजारी देश श्रीलंका देखील भारताच्या पुढे आहे . इतक्या कमी चाचण्या घेतल्या तर आकडेवारी कमीच राहणार हे सत्य आहे .केंद्र सरकार टेस्टची संख्या कमी ठेवून आपण कोरोनारुग्णांची संख्या नियंत्रित ठेवल्याचे सांगत असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे.

वर्ल्डोमीटर्सनं दिलेल्या आकडेवारीनुसार, प्रति १ लाख लोकसंख्यामागे सर्वाधिक चाचण्या घेणाऱ्या देशांच्या यादीत मोनॅकोचा पहिला क्रमांक आहे. प्रति एक लाख लोकसंख्यामागे मोनॅकोनं ४१,३०० नागरिकांच्या चाचण्या घेतल्या आहेत. यानंतर जिब्राल्टर (२७,५५२), यूएई (२५,६७०) या देशांचा क्रमांक लागतो. या यादीत डेन्मार्क (१३ व्या), स्पेन (१७ व्या), रशिया (२० व्या), ब्रिटन (२१ व्या), सिंगापूर (२७ व्या), अमेरिका (३० व्या) स्थानी आहेत. कोरोनामुक्त झालेला न्यूझीलंड या यादीत ३४ व्या क्रमांकावर आहे.


शेअर करा