धक्कादायक.. मृत व्यक्तीला चक्क कचरागाडीत टाकून नेले :पहा व्हिडीओ

शेअर करा

देशात कोरोनाची भयावह परिस्थिती असताना महाराष्ट्रात देखील कोरोनाची रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आर्थिक अडचणीत असताना देखील महाराष्ट्र सरकार चांगले काम करत आहेत तर दुसरीकडे केंद्राचा वरदहस्त असताना देखील भाजपशासित राज्यात रुग्णांना अक्षरश: जनावरासारखी वागणूक दिली जात आहे . भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात एका मृत व्यक्तीला चक्क कचऱ्याच्या गाडीत टाकून नेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून ह्या व्हिडीओने भाजपच्या विकासाची चांगलीच पोलखोल केली आहे .

उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात बुधवारी एक व्यक्ती उभ्या जागी बेशुद्ध पडली आणि खाली पडल्यावर लगेच सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या सरकारी कार्यालयाच्या मुख्य गेटजवळच अॅम्ब्युलन्स उभी होती. मात्र कोरोनाच्या भीतीने त्याने मृतदेह अॅम्ब्युलन्समधून नेण्यास नकार दिला. त्यामुळे नगर पालिका कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह चक्क कचऱ्याच्या गाडीतून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेक जणांनी ह्या अमानवीय अशा घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे .

मोहम्मद अन्वर असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून ते बुधवारी संध्याकाळी बलरामपूर तहसील कार्यालयात आले होते. त्यावेळी अचानक त्यांना त्रास होऊ लागला व ते बेशुद्ध पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी गेटवरची अॅम्ब्युलन्स बोलावली असता. कोरोनाच्या भीतीने अॅम्ब्युलन्सच्या चालकाने तो मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. त्यावेळी तिथे तीन पोलीस देखील उपस्थित होते. मात्र त्या तिघांनीही फक्त बघ्याची भूमिका घेतली. नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील तो मृतदेह कचऱ्याच्या गाडीत ठेवून हॉस्पिटलला पाठवून दिला. या प्रकरणी बलरामपूरचे अधिकारी कृष्णा करुनेश यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत नगर पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांना व तीन पोलिसांना निलंबित केलं आहे.

याआधी देखील उत्तर प्रदेशात मॉब लिंचिंग झाल्यानंतर मृत व्यक्तीस फरफटत नेण्याचा निंदनीय प्रकार घडला होता.


शेअर करा