तू काय संपवणार रे आम्हाला आम्हीच संपवू ? : प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून करून बायकोचा ” मास्टरप्लॅन “

शेअर करा

पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती गायब झाल्यानंतर विशेष म्हणजे पत्नीने आपला बनाव लक्षात येऊ नये म्हणून पोलिसात देखील तक्रार दिली मात्र तिचा जास्त शहाणपणा अंगलट आला आणि त्या सर्व गोष्टीचे बिंग फुटले.

काय आहे प्रकरण ?

बुलढाणा येथील सागवण परिसरात पत्नी लीला व तिचा मृत पती गणेश सरोजकर हे राहत होते . मृत गणेश सरोजकर हा चोरी करण्यात पटाईत होता तसेच तो नेहमी पत्नी लीला हिला मारहाण करत होता. त्याच्या या त्रासामुळे लीला एकाकी पडली होती अशात तिचे घराशेजारी राहणारा अनिल सुरोशे सोबत प्रेमसंबंध जुडले. याबाबत गणेशला समजल्यानंतर गणेशने लीला व अनिलला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने संपवण्याच्या आधीच आपणच त्याला संपवू असा प्लॅन या प्रियकर जोडीने रचला. अनिलने लीलाला सांगितले की, तू गणेशला नाक्यावर घेऊन ये. तेथे तुला महेंद्र खिल्लारे हा भेटेल. त्याच्या गाडीवर बसून तुम्ही हातेडी येथे या. तेथे माझा (म्हणजे अनिलचा ) मामा म्हणजे अरुण निकाळजे याच्या शेतात जाऊन त्याला दारुत विषारी औषध टाकून त्याचा गेम करू .

ठरलेल्या प्लॅन प्रमाणे, 25 मे रोजी पत्नी लीलाने गणेशला सोबत घेऊन माझे कुटुंब कल्याण ऑपरेशन करायचे आहे व त्यासाठी सरकारी दवाखान्यात पैसे भेटणार असून आपण जाऊ असे सांगून गणेशला सोबत घेतले. सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास महेंद्र खिल्लारे याच्या मोटर सायकलवर बसून अनिलच्या प्लॅन प्रमाणे हातेडी येथील अरुण निकाळजे याच्या शेतात आले. गणेश, अनिल, महेंद्र आणि अरुण त्यांनी सोबत दारू प्यायली. त्यापैकी एका बॉटलमध्ये विषारी औषध टाकले आणि ती बॉटल गणेशला पिण्यास दिली. ती पिल्यामुळे गणेशला अस्वस्थ वाटण्यास सुरुवात झाली. मात्र, एवढ्यावरच गणेश मरणार नाही, ही याची खात्री झाल्यानंतर महेंद्रच्या रुमालने चौघांनी मिळून फाशी देऊन जीवे मारले व त्याचा मृतदेह शेतात पुरून टाकला .

आपल्यावर प्रकरणात संशय येऊ नये म्हणून पत्नीने पती गायब झाल्याची तक्रार देखील पोलिसात दिली मात्र पोलिसांना सदर महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस तिच्यावर नजर ठेऊन होते .विवाहबाह्य संबंधाचा धागा लक्षात ठेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि प्रकरणाच्या मुळाशी पोहचले. या प्रकरणी आरोपी पत्नीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे.आरोपी लीला सरोजकर, अनिल सुरोशे, महेंद्र खिल्लारे आणि अरुण निकाळजे यांना जीवे मारल्या वरून विविध गुन्ह्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.


शेअर करा