जात पंचायतीचा माज..चारित्र्याच्या संशयावरून उकळत्या तेलात हात : पहा व्हिडीओ

शेअर करा

देशात कायद्याचे राज्य असले तरी समाजाला वेठीस धरण्याचा आपला हक्क सोडायला जात पंचायती आजही तयार नाहीत अर्थात कायद्याकडून न्याय मिळण्यास होणारा विलंब हे देखील याचे प्रमुख कारण आहे. जात पंचायतींकडून महिलांवर होणारे अमानुष अत्याचार आजही सुरुच असून असाच अमानवी स्वरुपाच्या परीक्षेचा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. आपण चारित्र्यवान आहोत हे सिद्ध करण्यासाठी एका महिलेला उकळत्या तेलात हात घालावा लागतोय, असा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जातपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. संबंधित महिलेच्या पत्नीनं दगडांची चूल मांडली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं. जर हात भाजला तर महिलेचे चारित्र्य खराब आहे आणि नाही भाजला तर ती पवित्र, अशी अघोरी परीक्षा ह्या व्यक्तीने तिला द्यायला लावली.

पुरोगामीत्वाचे पोवाडे गायले जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही महिलांना त्यांच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा द्यावी लागत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . देशात कायद्याचे राज्य असले तरी समाजाला वेठीस धरण्याचा आपला हक्क सोडायला जात पंचायती आजही तयार नाहीत अर्थात कायद्याकडून न्याय मिळण्यास होणारा विलंब हे देखील याचे प्रमुख कारण आहे. जात पंचायतींकडून महिलांवर होणारे अमानुष अत्याचार आजही सुरुच असून असाच अमानवी स्वरुपाच्या परीक्षेचा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. आपण चारित्र्यवान आहोत हे सिद्ध करण्यासाठी एका महिलेला उकळत्या तेलात हात घालावा लागतोय, असा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जातपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. संबंधित महिलेच्या पत्नीनं दगडांची चूल मांडली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं. जर हात भाजला तर महिलेचे चारित्र्य खराब आहे आणि नाही भाजला तर ती पवित्र, अशी अघोरी परीक्षा ह्या व्यक्तीने तिला द्यायला लावली.

असल्या अघोरी आणि अमानुष परीक्षेचा परिणाम त्या महिलेला माहिती होता त्यामुळे गयावया करत तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी बळजबरी केली. तिच्या पतीने तिला उकळत्या तेलात हात घालायला लावल्यावर स्वाभाविकरित्या तिचा हात भाजला आणि ती चारित्र्यहीन ठरली. महत्वाची बाब म्हणजे नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने या प्रकाराचा व्हिडीओ बनवला आहे आणि तो व्हायरलही केलाय. हा व्हिडीओ पारधी समाजातील असल्याचं त्यांच्या भाषेवरुन कळून येत आहे. पण तो नेमका कोणत्या भागातील आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

सदर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर जात पंचायत विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपींना शिक्षा करण्याची मागणी होत आहे. जात पंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी याबाबत आवाज उठवला आहे. असे न्यायनिवाडे हे पूर्णपणे अंधश्रद्धेवर आधारित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागानं या घटनेचा पाठपुरावा करुन आरोपीला शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अर्थात हा व्हिडीओ दुर्लक्षिलेल्या समाजातील आणि ग्रामीण भागातील असल्याने यावरून काही कोणत्या महिला आघाडी आक्रमक झालेल्या पाहायला मिळालेल्या नाहीत . आजही जात पंचायतीकडून असले अमानुष प्रकार सुरु असून स्त्रीयांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात आहे मात्र यांचा आवाज उठवणारे कोणीच नसल्याने तसेच कायद्याचे हात देखील जात पंचायतच्या गुन्हेगारांपर्यंत पोहचत नसल्याने असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत .


शेअर करा