पतीच्या मित्राशी ‘ अनैतिक ‘ संबंध जुळताच पत्नी फरार मात्र त्यानंतर प्रियकर म्हणाला …

  • by
Photo : Not Actual

आपल्या लग्नाच्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून आलेल्या एका महिलेनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मृत महिलेला 3 वर्षांची छोटीशी मुलगी असून ती आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून आली होती. पण प्रियकराने देखील तिला धोका दिल्यानंतर तिने घरातील पंख्याला फास घेवून जीव दिला आहे. ही घटना 12 फेब्रुवारी रोजी घडली होती. मात्र घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी 15 फेब्रुवारीला घरातील पंख्याला लटकलेला मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडची राजधानी रांचीजवळील खेलगाव गावातील आहे. गावातील आनंद विहार कॉलनीतील राहत्या घरात संबंधित महिलेने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रियकराला अटक केली आहे. घरातून निघून जाण्यापूर्वी आरोपीने मृत महिलेला मारहाण केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मृत महिला उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील रहिवाशी असून तिचं नाव हेमा आहे. हेमा तिच्या पतीचा मित्र सिद्धार्थच्या प्रेमात पडली होती. सिद्धार्थ आणि हेमाचे अवैध संबंध जुळले होते. त्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये हेमा 3 वर्षांच्या मुलीला घेवून आपल्या प्रियकराबरोबर रांची येथे पळून आली होती. खेलगावातील आनंद विहार कॉलनीत ती वास्तव्याला होती. पण प्रियकरासोबत पळून आल्यानंतर प्रियकराने तिला सोबत ठेवण्याच्या बदल्यात दोन लाख रुपयांची मागणी केली. यामुळे तिला सतत त्रासालाही सामोरं जावं लागलं. प्रियकराच्या अशा वागण्यामुळे त्रस्त झालेल्या हेमाने 12 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या दिवशी आरोपीने हेमाला मारहाण केली होती. आणि तो घरातून फरार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करुन तुरूंगात पाठवलं आहे. हेमाचा पती आशिषने रांची पोलिसांना सांगितलं की, त्याचं 2012 मध्ये हेमाशी लग्न झालं होतं. तो उत्तरप्रदेशातील फतेहपूरच्या गंगा नगरमध्ये राहतो. त्याचा मित्र सिद्धार्थ नेहमी घरी ये- जा करायचा. त्याचवेळी सिद्धार्थचं आणि आशिषची पत्नी हेमाचे प्रेमसंबंध जुळले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सिद्धार्थने आपली पत्नी आणि 3 वर्षांच्या मुलीला रांची येथे पळवून आणलं होतं. घरातून पळून जाताना हेमाने दागिने आणि 80 हजार रुपयेही घेवून गेली होती. तर डिसेंबरमध्ये हेमाने फोन करून आईला रांची येथे राहत असल्याची माहिती दिली होती.