कोरोना प्रतिबंधासाठी पुण्यात प्रशासनाने कंबर कसली, जाणून घ्या ‘ नवीन ‘ नियमावली

शेअर करा

हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर लग्न समारंभ, संमेलन, राजकीय रँलीत फक्त 200 लोकांची मर्यांदा असेल. या कार्यक्रमांसाठी पोलिसांची लेखी परवानगी आवश्यक असणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे राज्यभरातील कोरोनाचे नियम अधिक कडक करण्याची सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान पुण्यातील रुग्णसंख्या पाहता येथील कोरोनाच्या नियमांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागातील कोरोना हॉटस्पॉट निश्चित करुन तेथे सर्वेक्षण वाढवण्यात येणार आहे. दुसरीकडे कोरोनाविरोधात लढण्याचं बळ मिळण्यासाठी लसीकरणाचा वेगही वाढविणार आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता येथे काही कठोर निर्णय घेण्यात आले आहे. पुण्यात उद्यापासून रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवांना निर्बंधातून वगळण्यात आले आहेत.

याशिवाय भाजीपाला, दूधसेवा, पेपर सुरू राहणार आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार असून कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेसही बंद राहणार आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यात येणार आहे.हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर लग्न समारंभ, संमेलन, राजकीय रँलीत फक्त 200 लोकांची मर्यांदा असेल. या कार्यक्रमांसाठी पोलिसांची लेखी परवानगी आवश्यक असणार आहे.


शेअर करा