रोज मोबाईल गेम खेळणारी अल्पवयीन मुलगी ‘ रहस्यमय ‘ गायब आणि त्यानंतर …

  • by

नवी मुंबई परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून FREE FIRE नावाच्या ऑनलाइन व्हिडीओ गेम खेळताना एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध बनवून मुलीला भेटण्यासाठी चक्क 19 वर्षीय युवक दिल्लीमधून नवी मुंबईत आला आणि मुलीला घेऊन पळून गेला आणि लग्नाचे आमिष दाखवून 4 ते 5 वेळा बलात्कार केला. सदर आरोपीला नवी मुंबई रवाले एमआयडीसी पोलिसांनी हरियाणाच्या गुडगावमधून अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवाले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हद्दीतून 1 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2 च्या सुमारास 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण झाल्याची फिर्याद पालकांनी दिली होती. सदर मुलगी राहणाऱ्या घरातून कोणाला काही न सांगता पळून गेली असे पालकांनी पोलिसांना सागितलं. पोलिसांनी अपहरणचा गुन्हा दाखल करून पथक तयार केलं. सदर पथक डीसीपी सुरेश मेंगडे आणि सहायक पोलिस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलं होतं.

पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगी एका इसमाच्या सोबत दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणामध्ये गेली होती. माहिती मिळाल्यावर पथक रवाना करण्यात आला. ज्यावेळी पथक दिल्लीला पोहचलं त्यावेळी आरोपी तिथून गुडगावला पळला. पथकाने हरियाणा पोलीसांच्या मदतीने आरोपी ताबीज तुफेल खान याला गुडगावच्या सरोली गावातून ताब्यात घेतले आणि मुलीची सुटका केली.

सदर मुलीला घेऊन आरोपी ताबीज तुफेल खान (वय 19) 12 दिवस उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, गुडगाव या परिसरात फिरत होता. परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे ,सहायक पोलिस आयुक्त विनायक वस्त, रवाले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्राईम रामचंद्र घाडगे आणि यशवंत पाटील यांनी 3 पथकं तयार केली होती. याच पथकांनी सदर मुलीची सुटका करुन आरोपीला अटक केली.

आरोपी ताबीज खानची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, पीडित अल्पवयीन मुलीसोबत मोबाईलवर FREE FIRE नावाच्या ऑनलाईन व्हिडिओ गेम खेळत असताना ओळख वाढवली. नंतर तिच्याशी मैत्री करुन प्रेमसंबंध निर्माण केली. मुलीच्या पालकांना न सांगता मुलीचं अपहरण करुन परिसरातून तिला पळवून दिल्ली नेले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत 4 ते 5 वेळा बलात्कार केला.

आरोपी ताबीज खानवर बलात्कार, अपहरण, पोक्सो कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय असून त्याला वेळापूर कोर्टात दाखल केले असता कोर्टाने 22 फेब्रुवारी पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी दिली आहे. ऑनलाईन गेमच्या साहाय्याने अजून किती मुलींसोबत अशी कृत्य केली का, याचा शोध रवाले एमआयडीसी पोलीस घेत आहेत.