‘ ह्या ‘ जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाऊन तर उद्धव ठाकरेंच्या जनसंवादात काय संकेत ?

  • by

राज्यात करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळाले असल्याचे दिसत असताना अचानक पुन्हा करोनाने उचल खाल्ल्याने जनतेसह राज्य सरकारच्याही चिंतेत वाढ झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला त्यावेळचे मुख्य हायलाईट्स

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादातील मुख्य मुद्दे

परिस्थिती पाहून लॉकडाउन राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल

लॉकडाउन नको हवा असेल तर मास्क घालणे गरजेचे… मास्क घाला लॉकडाउन टाळा- मुख्यमंत्री ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन.

तुम्हाला लॉकडाउन हवे की नको?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेला प्रश्न.

गर्दी जमवणारे मोठे सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुकांवर राज्यात उद्यापासून काही दिवसांसाठी बंदी- उद्धव ठाकरे.

उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना राज्यात बंदी- ठाकरे

अमरावती जिल्ह्यात उद्या संध्याकाळपासून काही बंधने अंमलात आणण्याच्या सूचना

पुन्हा एकदा काही ठिकाणी बंधने पाळावी लागणार आहेत- ठाकरे

लॉकडाउन नको असेल तर शिस्त पाळणे गरजेचे- ठाकरे.

जे मास्क घालणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणारच- ठाकरे.

लॉकडाउन करायचा का हाच आजचा सर्वात मोठा विषय आहे- ठाकरे.

राऊत यांनी लग्नाचा सोहळा रद्द केला. राऊत यांनी दाखवलेली जाणीव इतरही दाखवतील.- ठाकरे

संसर्गाची साखली तोडायची असेल, तर संपर्क हा टाळायलाच हवा- ठाकरे.

मधल्या काळात आपल्यात शिथिलता आली- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

आपल्या राज्यात पुन्हा एकदा डोकं वर काढतोय, मात्र आपल्या राज्यात दुसरी लाट आली की नाही, ते ८ ते १५ दिवसांमध्ये कळेल- मुख्यमंत्री ठाकरे.

मास्क ही आपली ढाल आहे, मास्क वापरला नाही तर हा शत्रू आपल्याला गाठल्याशिवाय राहणार नाही. मास्क घालणे अनिवार्य आहे- मुख्यमंत्री ठाकरे.

राज्यात करोना पुन्हा डोकं वर काढतोय- ठाकरे.

आणखी दोन-तीन कंपन्या लसनिर्मितीसाठी पुढे येत आहेत. त्यानंतर जनतेलाही लस देणार- मुख्यमंत्री ठाकरे

कोविड योद्ध्यांनी बेधडकपणे लस टोचून घ्यावी, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

करोनाची लस टोचल्यानंतर कोणतेही घातक साईड इफेक्ट आढळलेले नाहीत- ठाकरे

घरात बंद ठेवणे कोणालाही आवडणार नाही- उद्धव ठाकरे

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता अमरावतीत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना राज्यात अनलॉकनंतर पहिला लॉकडाऊन हा अमरावतीत जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीत सोमवारी संध्याकाळी ८ वाजल्यापासून अमरावती शहर, अचलपूर शहरात पुढील आठवडाभर कडक लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये प्रामुख्याने दुकानांच्या वेळा सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार असून, विवाह समारंभाकरिता २५ व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. सदरचे निर्बंध हे १ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत राहणार आहेत.

नाशिकमध्ये उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदीची घोषणा आज(रविवार) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली . करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितलं आहे. तसेच, लॉकडाउनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, करोनामुळे पुणेकरांना पुन्हा काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात रात्री ११ वाजेनंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.