पुणे हादरले..टिकटॉक स्टार समीर गायकवाडची गळफास घेऊन आत्महत्या

  • by

पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने आत्महत्या केली आहे. 22 वर्षीय समीरने रविवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या राहत्या घरात पंख्याला साडी बांधत गळफास घेऊन जीवन संपवलं. समीर गायकवाड हा व्हिडिओच्या हटके स्टाईलमुळे अल्पावधीतच तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला होता. टिकटॉकवरील त्याचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.मात्र आता त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, टिकटॉक स्टार असणाऱ्या समीरने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. समीर गायकवाड हा पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. एका खोलीत समीरने गळफास घेतल्याचं त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्यानंतर समीरच्या भावाने तातडीने जवळच्या पोलीस स्थानकात याबाबतची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. त्यामुळे समीरच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

समीर मनीष गायकवाड (वय २२, रा. निकासा सोसायटी, केसनंद रोड, वाघोली) असे याचे पूर्ण नाव असून राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी याची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली.

समीर याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरुन लाईफ लाईन हॉस्पिटलला तातडीने नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे सांगितले. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर आले नाही. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिल्याचे घरात आढळून आले नाही. म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता.