नगर कोतवालीचा विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा ‘ तसाच ‘ गुन्हा, यावेळी पीडिता म्हणतेय…

  • by

वादग्रस्त असलेला तसेच सध्या निलंबित असलेला कोतवाली पोलिस स्थानकाचा तत्कालीन निरीक्षक विकास वाघ याच्या विरोधात पुन्हा एकदा महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे विशेष म्हणजे आधीच्या गुन्ह्यातील पीडित महिलेने पुन्हा एकदा वाघ याच्या विरोधात तक्रार दिली असून विकास वाघ याच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, 11 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता शहरातील सिव्हील हॉस्पिटलच्या मागे व त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता मिस्किन मळा येथील झाडीत अत्याचाराची घटना घडली. याबाबत सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विकास वाघ हा मला 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे घेऊन गेला

तेथे त्याने लाकडी दांड्याने मारहाण करत तू माझ्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घे, असे म्हणून धमकावत मला गंगा उद्यान परिसरातील मिस्किन मळा येथे घेऊन गेला तिथे गेल्यानंतर माझे मंगळसूत्र व रोख साठ हजार रुपये माझ्याकडून हिसकावून नेले, असा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडेकर हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान विकास वाघ यांच्या विरोधात सप्टेंबर २०२० मध्येच याच महिलेने कोतवाली स्थानकांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल असून विकास वाघ हा सध्या निलंबित आहे.

विकास वाघ याची एकंदरीत करिअरच वादग्रस्त राहिलेली आहे. याआधीचे देखील एक प्रकरण असून हे दुसरे प्रकरण घडल्याने वाघ याच्या कारनाम्याची नगर शहरात मोठी चर्चा आहे. 29 सप्टेंबरला विकास वाघ विरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाला त्यावेळी विकास वाघ आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. गुन्हा दाखल झाल्यापासून वाघ गायब आहे.

नक्की प्रकरण काय आहे ?

2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलिस ठाण्याच्या कार्यालयात आलेल्या 26 वर्ष महिलेशी वाघ याने ओळख वाढवली. काही दिवसानंतर वाघ हा पीडित महिलेच्या घरी गेला. तिथे तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत वाघ याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. प्रतिकार केला असता वाघ याने तिला कंबर पट्टाने जोरदार मारहाण केली तसेच ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकीन अशी धमकी देखील दिली. त्यानंतर वाघ यांने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला.पीडित महिलेचे वय हे २६ असून माझ्या ९ वर्षाच्या मुलाच्या जीविताला धोका असल्याने आजवर मी हे सहन केले असे पीडितेचे म्हणणे आहे .

पीडित महिला ही गरोदर राहिल्याची समजताच वाघ याने 26 सप्टेंबर 2019 रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर घेऊन गेला आणि जबरदस्तीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि मारहाण केली . पीडिता शुद्धीत आल्यानंतर ‘ मी लवकरच तुझ्याशी लग्न करणार आहे.. आता तू ह्या गोळ्या खा ‘ असे सांगून गर्भपातही घडवून आणला. या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला.

ही बाब वाघ याला समजताच त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली तसेच तिच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या. 11 सप्टेंबर 2020 रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने मीरावली पहाडावर नेऊन तिच्यावर अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून वाघ याच्या विरोधात बलात्कार,मारहाण तसेच जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच ही दुसरी तक्रार पीडित महिलेने दिल्याने विकास वाघ याच्या अडचणी वाढणार आहेत.