नगर हादरले..सतत पती द्यायचा त्रास आणि ‘ अशातच ‘ एके दिवशी ?

  • by
चित्र : सांकेतिक

घरगुती वादातून पती नेहमीच त्रास देत असल्याने पत्नीने तिच्या भावाला मदतीला घेऊन पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील वाळुंज फाटा शिवारात रविवारी पहाटे घडलेली आहे. घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे आणि प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

संतोष दत्तात्रय मोरे ( वय ४२ राहणार वाळुंज फाटा ) असे मयताचे नाव आहे घटनेनंतर. नगर तालुका पोलिसांनी संतोष याची पत्नी प्रियांका व तिचा भाऊ रामेश्वर विठ्ठल दशवंत ( राहणार तहाराबाद तालुका राहुरी ) यांना अटक केली आहे. सतत पती त्रास देत असल्याने पत्नीने राग अनावर झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार मयत संतोष व पत्नी प्रियांका यांचे घरगुती कारण तू कारणावरून नेहमीच भांडण होत होते. रविवारी प्रियंका हिचा भाऊ रामेश्वर हा तिच्या घरी आला होता त्यानंतर संतोष आणि प्रियांका यांच्यात भांडण सुरू झाले.

भांडण सुरू झाल्यानंतर काही वेळातच हाणामारीला सुरुवात झाली यावेळी रामेश्वर आणि प्रियंकाने संतोष याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच रामेश्वर याने संतोष याच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा तुंब्या मारल्याने संतोष याचा मृत्यू झाला.

घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सानप यांनी प्रियांकाकडे विचारपूस केली असता रात्रीच्या भांडणात पाय घसरून संतोषचा मृत्यू झाल्याचा बनाव तिने रचला मात्र तिच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने सानप यांनी तिची कसून चौकशी केली

कसून चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान संतोषचा खून करून रामेश्वर रात्रीच पसार झाला होता. सानप यांच्या पथकाने रविवारी दुपारी तहाराबाद येथून त्याला अटक केली. याप्रकरणी मयत संतोष याचा चुलत भाऊ संदीप सोपान मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.