तहसीलदार ज्योती देवरे पोहचल्या मंगल कार्यालयात आणि गर्दी दिसताच …

शेअर करा

मंगल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर असणारी गर्दी आणि विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर येथे कारवाई करत रविवारी दोन मंगल कार्यालय मालकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. रविवारी दुपारी तहसीलदार ज्योती देवरे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर शहरातील मनकर्णिका मंगल कार्यालय व लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जाऊन पाहणी केली. दोन्ही मंगल कार्यालयात गर्दी दिसत असल्याने प्रत्येकी 25 हजार रुपये दंड मंगल कार्यालय चालकास ठोठावण्यात आला आहे.

बसस्थानक परिसरात दोन्ही अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई देखील केली. ही कारवाई अशीच सुरु राहणार असून नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार देवरे यांनी केले आहे.

देवरे पुढे म्हणाल्या, ‘ मंगल कार्यालयात गर्दी दिसत असल्यास ते सील केले जातील. पारनेर तालुक्यात शासकीय नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यापुढे देखील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करून दंड वसुली करण्यात येणार आहे ‘


शेअर करा