अखेर ‘ या ‘ ठिकाणी काँग्रेसचे सरकार कोसळले मात्र आधी भाजपने केली अशी खेळी

  • by

देशभरात काँग्रेसच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत .केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीत ( पौंडेचरी ) काँग्रेस – डीएमके आघाडीचं सरकार कोसळलंय. विधानसभेत व्ही नारायणसामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपला राजीनामा नव्या नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवला आहे.

विधानसभेत चर्चेदरम्यान मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी बहुमताचा केलेला दावा फोल ठरला. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावादरम्यान काँग्रेस आणि डीएमकेच्या आमदारांनी ‘वॉक आऊट’ करत सदनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आली.

उल्लेखनीय म्हणजे, येत्या काही महिन्यांत (एप्रिल-मे मध्ये) पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसोबतच पुदुच्चेरीमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीच व्ही नारायणसामी सरकार कोसळल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झालेली आहे. पुडुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून किरण बेदी यांना काही दिवसापूर्वीच केंदाकडून हटवण्यात आले होते.

राज्यातील काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्याने नारायणस्वामी सरकार अल्पमतात आलं होतं. किरण बेदी यांनीच हे घडवून आणलं, अशी टीका काँग्रेस करत होती. त्यामुळे लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला सहानुभूती मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. याच कारणामुळे किरण बेदी यांनाच हटवून आपण धुतल्या तांदळाचे असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपने किरण बेदी यांना रातोरात पदावरून हटवले. गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे सरकार पाडण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

किरण बेदीच पदावर नसल्यानं काँग्रेसला सहानुभूती मिळणं अवघड होईल तसेच भाजप किंवा किरण बेदी यांनी यात काहीच भूमिका वठवली नाही हे जनतेला पटवून सांगणे सोपे होईल. राज्यात निवडणुका असल्याने राहुल गांधी यांनी काही दिवसांत तेथील नेत्यांशी दिल्लीत चर्चा केली. विश्वासातील नेते दिनेश गुंडू राव यांच्याकडे पुडुचेरीची जबाबदारी सोपविली. राहुल गांधी बुधवारी पुडुचेरीच्या दौऱ्यावर असल्यानं त्याआधी एक दिवस बेदी यांना दूर करण्यात आलं.

सरकारच्या कामात निष्कारण हस्तक्षेप करणाऱ्या, सरकारला काम करू न देणाऱ्या किरण बेदी यांना दूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी सातत्यानं केली होती. भाजपनं पुडुचेरी निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल व राजीव चंद्रशेखर यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत हा केंद्रशासित प्रदेश ताब्यात घेण्याचा अमित शहा व जे. पी. नड्डा यांचा प्रयत्न आहे.