‘ उकळत्या तेलात हात ‘ प्रकरणात ‘ गंभीर ‘ अँगल समोर, पोलिसांपुढे आव्हान

  • by

पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जातपंचायतीने महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. संबंधित महिलेच्या पतीनं दगडांची चूल मांडली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवऱ्याने त्या कढईत ५ रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास महिलेला सांगण्यात आलं.जात पंचायतीच्या या अमानुष न्यायनिवाड्याचा छळाचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात घडला आहे.

असल्या अमानुष परीक्षेचा परिणाम त्या महिलेला माहिती होता. ती तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी जोरजबरदस्ती केली. उकळत्या तेलातील नाणं बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध जर तिचा हात भाजला तर तिला चारित्र्यहीन असल्याचं जाहीर केलं जातं.

या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशी अमानवी शिक्षा देणाऱ्यांवर जात पंचायत विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली आहे. मात्र, आता या प्रकाराला वेगळेच वळण लागलेले असल्याने उस्मानाबाद पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे लक्ष आहे.

मात्र आता या संपूर्ण प्रकरणाला एक गंभीर वळण लागलं आहे. पीडित महिलेवर गावातील एका व्यक्तीसह पोलीस कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडिता आणि तिच्या पतीने केला आहे. यांचा दाम्पत्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात गावातील एक व्यक्ती आणि परंडा पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याने संबंधित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवऱ्याला तुरुंगात डांबण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती टीव्ही ९ने दिली आहे.

देशात कायद्याचे राज्य असले तरी समाजाला वेठीस धरण्याचा आपला हक्क सोडायला जात पंचायती आजही तयार नाहीत अर्थात कायद्याकडून न्याय मिळण्यास होणारा विलंब हे देखील याचे प्रमुख कारण आहे. जात पंचायतींकडून महिलांवर होणारे अमानुष अत्याचार आजही सुरुच असून असाच अमानवी स्वरुपाच्या परीक्षेचा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. आपण चारित्र्यवान आहोत हे सिद्ध करण्यासाठी एका महिलेला उकळत्या तेलात हात घालावा लागतोय, असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

देशात कायद्याचे राज्य असले तरी समाजाला वेठीस धरण्याचा आपला हक्क सोडायला जात पंचायती आजही तयार नाहीत अर्थात कायद्याकडून न्याय मिळण्यास होणारा विलंब हे देखील याचे प्रमुख कारण आहे. जात पंचायतींकडून महिलांवर होणारे अमानुष अत्याचार आजही सुरुच असून असाच अमानवी स्वरुपाच्या परीक्षेचा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. आपण चारित्र्यवान आहोत हे सिद्ध करण्यासाठी एका महिलेला उकळत्या तेलात हात घालावा लागतोय, असा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

असल्या अघोरी आणि अमानुष परीक्षेचा परिणाम त्या महिलेला माहिती होता त्यामुळे गयावया करत तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी बळजबरी केली. तिच्या पतीने तिला उकळत्या तेलात हात घालायला लावल्यावर स्वाभाविकरित्या तिचा हात भाजला आणि ती चारित्र्यहीन ठरली. महत्वाची बाब म्हणजे नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने या प्रकाराचा व्हिडीओ बनवला आहे.

सदर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर जात पंचायत विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपींना शिक्षा करण्याची मागणी होत आहे. जात पंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी याबाबत आवाज उठवला आहे. असे न्यायनिवाडे हे पूर्णपणे अंधश्रद्धेवर आधारित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागानं या घटनेचा पाठपुरावा करुन आरोपीला शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अर्थात हा व्हिडीओ दुर्लक्षिलेल्या समाजातील आणि ग्रामीण भागातील असल्याने यावरून काही कोणत्या महिला आघाडी आक्रमक झालेल्या पाहायला मिळालेल्या नाहीत . आजही जात पंचायतीकडून असले अमानुष प्रकार सुरु असून स्त्रीयांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात आहे मात्र यांचा आवाज उठवणारे कोणीच नसल्याने तसेच कायद्याचे हात देखील जात पंचायतच्या गुन्हेगारांपर्यंत पोहचत नसल्याने असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत .