बुफेचे ताट वाढून घेतले अन जिल्हाधिकारी धडकले, ‘ ह्या ‘ तीन मंगल कार्यालयात कारवाई

  • by

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही लोक नियम पाळत नसल्याने नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पथकासह शहरातील मंगल कार्यालयांची तपासणी करत नियमभंग केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी सोमवारी दुपारी नगर औरंगाबाद रोड वरील आशीर्वाद लॉन्स, सिटी लॉन्स, ताज लॉन्स या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी तिन्ही ठिकाणी लग्न सोहळा व कार्यक्रम सुरू होते आणि प्रत्येक ठिकाणी 50 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती आढळून आली त्यातील अनेकांनी मास्क देखील लावलेले नव्हते.

सोशल डिस्टंसिंगचा नियम देखील कोणीही पाळत नसल्याचे आढळून आले. पाहुणे मंडळी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेत होते यावेळी तीनही लॉन्स मधील एकूण 130 जणांना मास्क न घातल्याने दंड करण्यात आला. दंडाची ही रक्कम संबंधित लॉन मालकाकडून वसूल केली जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी लॉन्स मालकासह उपस्थितांना कोरोना संदर्भातील नियम पाळण्याची समज दिली.

त्यानंतर नगर महाविद्यालयात जाऊन भेट देऊन पाहणी केली तेव्हादेखील मास्क न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली यावेळी जिल्हा विशेष शाखेचे पोलिस अधीक्षक राजेंद्र पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर आदी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता कडक कारवाईस प्रारंभ केला आहे

गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात कोरोना संदर्भातील नियम तोडल्या प्रकरणी दोन हजार शंभर केसेस दाखल करण्यात आले आहेत तसेच नियम पाळण्याबाबत 250 खाजगी संस्थांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे येणाऱ्या काळात आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नगर शहरात बहुतांश लोक प्रशासनाच्या सूचनांकडे गांभीर्याने घेत नसल्याने आता थेट कारवाईला समोर जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा प्रशासनाने दिला आहे