आणि ‘ तो ‘ अपघात प्रियकरासाठी पत्नीनेच घडवून आणला, कार्यपध्दती पाहून पोलिसही हैराण

  • by

विवाहबाह्य संबधातून पत्नीनेच आपल्या पतीची हत्या घडवून आणल्याची घटना मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पत्नीनेच कट रचून पतीची हत्या घडवून आणली. पत्नीचे अन्य तरुणासोबत अनैतिक संबंध होते. याबाबत तिच्या पतीला समजले. त्याने विरोध केला. पत्नीने त्याच्या हत्येची सुपारी दिली आणि अपघात घडवून आणला त्यात पतीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, १२ फेब्रुवारीला रितू खरे याच्या दुचाकीला चारचाकीने धडक दिली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. कैमोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला होता. हा अपघात नसून हत्येचा कट असल्याची कुणालाही शंका आली नव्हती मात्र एक क्लू पोलिसांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून मिळाला आणि त्यांनी तपास सुरु केला.

अपघातात रितू खरे आणि दादुराम यादव यांचा मृत्यू झाला होता. तर लालजी हा गंभीर जखमी झाला होता. मृत रितू उर्फ गौरव खरे याची पत्नी पुष्पलता उर्फ नंदिनी हिचे अमित नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. त्याबाबत पतीला समजले. त्यामुळे तो तिला कुठेही एकटीला जाऊ देत नव्हता. त्यामुळे चिडलेल्या नंदिनीने त्याच्या हत्येचा कट रचला होता.

नंदिनीने प्रियकर अमित याच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला आणि फज्जू आणि फैजान यांना हत्येची सुपारी दिली. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी अमित हा फज्जू खान याच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. तो रितू खरे कुठे आहे याची माहिती फ़ाज्जूला देत होता. सोमवारी कटनीच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना हत्येचा उलगडा केला. पतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नी नंदिनी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.