डिलिव्हरी बॉयचा कारनामा.. ‘ सर्व्हिस कशी वाटली व्हिडीओ कॉलवर सांगा ‘ अन नंतर …

  • by

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात एका केक डीलिव्हरी बॉयचे कारनामे उघड झाल्यानंतर कुणाला विश्वास बसत नव्हता. महिला घरातही सुरक्षित नाहीत, हेच या घटनेवरून सिद्ध झाले असून केक डिलिव्हरी करायला येणाऱ्या डिलिव्हरी बॉयने केलेले गुन्हे इतके गंभीर आहेत, की त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे.

एका प्रसिद्ध कंपनीच्या केक डीलिव्हरी बॉयने ६६ महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने केलेले गुन्हे उघडकीस आल्यानंतर पोलीसही हैराण झाले. महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करायचा. डिलिव्हरी बॉय हा प्रख्यात कंपनीच्या उत्पादनांबाबत फिडबॅक घेण्याच्या बहाण्याने महिलांना व्हिडिओ कॉल करायचा.

फिडबॅक घेण्याच्या नावाखाली महिलांना व्हिडिओ कॉल करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ एडिट करून बनवायचा आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा. या महिलांना तो शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचा. पोलिसांच्या माहितीनुसार, हुगळीच्या क्योटामधील त्रिकोण पार्कमध्ये राहणाऱ्या विशाल वर्मा या तरुणावर ६६ महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. चुचुडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशालला आणि त्याच्या साथीरादाराला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी विशालच्या आईने मुलाने केलेल्या कृत्याची कबुली देतानाच, त्याला या गुन्ह्यांत साथ दिल्याचा आरोपही मान्य केला आहे. पोलिसांनी विशालविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.आरोपी विशाल याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी परिसरातील महिलांकडून करण्यात येत आहे.