महागाईचा आगडोंब..सरकार ‘ तू तू मै मै ‘ मध्ये व्यस्त, काय काय झालेय महाग ?

शेअर करा

नगर जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा दर आठशे रुपये तर पेट्रोलचा दर तब्बल 97 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. साध्या पेट्रोलचे शतक पार करण्यासाठी आता फक्त तीन रुपये बाकी आहेत. पेट्रोल पाठोपाठ गॅस दरवाढीने देखील सामान्य नागरिक हैराण झाले असून घरामध्ये फोडणीसाठी आवश्यक असलेल्या गोडतेलाचा भाव देखील चांगलाच भडकला आहे.

पेट्रोल व डिझेल दर दर दर दिवशी 25 पैशाने वाढत आहे. नगर शहरात सध्या पेट्रोलचा दर शहाण्णव रुपयापेक्षा जास्त आहे त्यामुळे आठ दिवसात पेट्रोलचा दर आता शंभरीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर डिझेलने देखील 86 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे. या दरवाढी पाठोपाठ 15 फेब्रुवारीला गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे.

1 महिन्यापूर्वी हा दर 732 रुपये 50 पैसे असा होता त्यात वाढ होऊन आता तो 772 रुपये 50 पैसे इतका झालेला आहे. ही किंमत घरपोच गॅस सिलेंडरची असली तरी सिलेंडर देणारे दहा ते पंधरा रुपये घेतात किंवा दिले जातात ग्रामीण भागातही वाहतुकीचा खर्च समाविष्ट केल्यानंतर ही किंमत आठशे रुपयेपर्यंत जाते. दरम्यान काही किराणा मालाचे देखील दर वाढलेले आहेत, त्यामध्ये गोडेतेल पाच ते दहा रुपयांनी वाढले आहे तर तूर डाळ देखील दहा रुपयांनी महाग झाली आहे.

गॅस कंपन्यांनी निश्चित करून दिले जे दर आहेत तेच दर नगरपालिका व महापालिका क्षेत्रात कायम राहतील. ग्रामीण भागात मात्र एजन्सी पासून सहा ते दहा किलो मीटर साठी वीस रुपये, अकरा ते वीस किलोमीटर साठी 25 रुपये, एकवीस ते तीस किलो मीटर साठी तीस रुपये, 31 किलोमीटरच्या पुढे पन्नास रुपये असा वाहतूक दर पुरवठा विभागाने निश्चित केलेला आहे


शेअर करा